Coronavirus | केरळमध्ये गेल्या २४ तासांत वाढले ३०% रुग्ण, तर २१५ जणांचा मृत्यू

केरळमध्ये गेल्या २४ तासांत ३१ हजारांपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर १९.०३ या पॉझिटीव्हीटी रेटसह एकाच दिवसात २१५ जणांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus | केरळमध्ये गेल्या २४ तासांत वाढले ३०% रुग्ण, तर २१५ जणांचा मृत्यू
Coronavirus | केरळमध्ये गेल्या २४ तासांत वाढले ३०% रुग्ण, तर २१५ जणांचा मृत्यूSaam Tv News
Published On

देशभरात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याते दिसत आहे. कोरोनोची दुसरी लाट ओसरली असली तरी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. अशातच केरळमधून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. केरळमध्ये गेल्या चोवीस तासांत सुमारे ३०% नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत त्यामुळे देशाची चिंता वाढली आहे. (30% new corona cases in kerala 215 died)

हे देखील पहा -

केरळमध्ये गेल्या २४ तासांत ३१ हजारांपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर १९.०३ या पॉझिटीव्हीटी रेटसह एकाच दिवसात २१५ जणांचा मृत्यू झाला आहे. केरळ सरकारने ओणम या सणाला कारणीभूत ठरवले आहे. २१ ऑगस्टला केरळमध्ये ओणम साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती त्यामुळेच अचानक रुग्णसंख्या वाढली असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार एर्नाकुलम जिल्ह्यात सर्वाधिक 4,048 रुग्णांची नोंद झाली आहे, त्यानंतर त्रिशूर (3,865), कोझीकोड (3,680), मलप्पुरम (3,502), पलक्कड़ (2,562), कोल्लम (2,479), कोट्टायम (2,050), कन्नूर (1,930) अलाप्पुझा (1,874), तिरुवनंतपुरम (1,700), इडुक्की (1,166) पठानमथिट्टा (1,008) आणि वायनाड (962) एवढी रुग्णसंख्या वाढली आहे.

Coronavirus | केरळमध्ये गेल्या २४ तासांत वाढले ३०% रुग्ण, तर २१५ जणांचा मृत्यू
सावधान! परभणीत व्हायरल फिव्हर बरोबर डेंग्यूची लाट

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गर्दी टाळण्याचे आवाहन केंद्र आणि राज्या सरकार वारंवार करत असते. मात्र तरीही लोकांकडून अनेकदा गर्दी केली जाते. याचाच परिणाम म्हणून कोरोनाचा प्रसारही वाढतो. सध्या देशात 3,22,327 अॅक्टीव्ह रुग्ण असून 4,35,758 लोकांचा मृत्यू झाला आहे.तर महाराष्ट्रात 53,260 अॅक्टीव्ह रुग्ण असून 1,36,355 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्रात 4,00,04,541 लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला असून 1,44,56,478 लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com