सावधान! परभणीत व्हायरल फिव्हर बरोबर डेंग्यूची लाट

संख्या वाढल्याने रुग्णालय पूर्ण क्षमतेने भरले आहे.
सावधान! परभणीत व्हायरल फिव्हर बरोबर डेंग्यूची लाट
सावधान! परभणीत व्हायरल फिव्हर बरोबर डेंग्यूची लाटSaam Tv
Published On

परभणी - जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून व्हायरल फिव्हर Viral Fever बरोबर डेंग्यूचा Dengue फैलाव झाला असून रुग्णांची संख्या वाढल्याने रुग्णालय Hospital पूर्ण क्षमतेने भरले आहे. पावसाळा Rain सुरू होताच साथीचे आजार वाढतात त्यात कोरोना आणि आता त्या पाठोपाठ ह्या वर्षी डेंग्यू व चिकनगुनिया यासारख्या साथीच्या आजारा फैलाव झाला आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात देखील या आजाराची साथ मोठ्या प्रमाणात पसरत आहे. येथील जिल्हा रुग्णालयात ताप खोखल्याने त्रस्त असलेले रुग्ण मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.

हे देखील पहा -

जिल्हा रुग्णालयात साधारण 1200 रुग्णांची ओपिडि आहे तिथे 3000 हजार रुग्ण तपासणी साठी येत असल्याने जिल्हा रुग्णालयात अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रुग्णांना खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. जिल्हा हिवताप कार्यालयाने डेंग्यूच्या 276 तपासण्या केल्या आहेत तर मलेरियाच्या 23 हजार 392 तपासण्या केल्या आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या परिस्थीतीत साथीच्या आजाराने डोके वर काढल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com