अजब प्रेम की गजब कहानी! २८ वर्षांचा भोलू ६७ वर्षांच्या रामकलीसोबत लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये

28 Years Man Loves 67 Years Woman: हे दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत असले तरी त्यांना लग्न करायचं नाहीय, कारण त्यांना लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहायचयं.
Gwalior: 28-year-old youth falls in love with 67-year-old woman
Gwalior: 28-year-old youth falls in love with 67-year-old womanThe Free Press Journal
Published On

भोपाळ (मध्यप्रदेश):

प्रेम हे आंधळं असतं हे आपण नेहमीच ऐकतो. अनेकांच्या प्रेम प्रकरणाचे किस्से आपल्याला कळतं की, प्रेमात अन् युद्धात सर्वकाही माफ असत. अशीच एक अनोखी प्रेमकहाणी (Love Story) फुलली आहे मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) ग्वाल्हेर (Gwalior) जिल्ह्यात. एक २८ वर्षांचा युवक आणि ६७ वर्षांच्या आजी हे चक्क एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. एवढचं नाही तर, त्या दोघांना आयुष्यभर सोबत राहण्याचा निर्णय घेतलाय, तेही लग्न न करता... (Gwalior: 28-year-old youth falls in love with 67-year-old woman; submits documents to be in live-in relationship)

हे देखील पहा -

मुरैना जिल्ह्यातील रहिवासी असलेला २८ वर्षीय भोलू नावाचा तरुण आणि ६७ वर्षीय महिला हे आता लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये (live-in relationship) राहत असून त्यांच्या नात्याला कायदेशीर वैधता मिळवण्यासाठी दोघेही थेट कोर्टात पोहोचले. हे दोघेही मुरैना जिल्ह्यातील कैलारस परिसरातील रहिवासी असल्याचं त्याचे वकील दिलीप अवस्थी यांनी सांगितलं. तरुणाचं नाव भोलू तर महिलेचं नाव रामकली असं आहे. हे दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत असले तरी त्यांना लग्न करायचं नाहीय, कारण त्यांना लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहायचयं. त्यासाठी लिव्ह-इन रिलेशनशिपची नोंदणी करण्यासाठी हे जोडपं आपापल्या कागपत्रांसह नोटरी करण्यासाठी ग्वाल्हेर जिल्हा न्यायालयात पोहोचलं.

Gwalior: 28-year-old youth falls in love with 67-year-old woman
सावधान! तुमच्या मोबाईलमधून होतेय दररोज डेटा चोरी

रामकली आणि भोलू यांच्या वयात ३९ वर्षांचा फरक:

रामकली आणि भोलू यांच्या वयात तब्बल ३९ वर्षांचा फरक आहे. रामकली आणि भोलू गेल्या 6 वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहत असून त्यांना त्यांचे भविष्य एकत्र घालवायचे आहे. त्यासाठी त्यांनी ग्वाल्हेर न्यायालयातून नोटरी बनवली आहे. रामकली आणि भोलू सांगतात की दोघेही एकमेकांवर प्रेम करतात. लिव्ह-इन रिलेशनमध्ये असताना, भविष्यात कोणताही वाद होऊ नये आणि त्यांचे नाते पूर्वीपेक्षा अधिक दृढ व्हावे, यासाठी ते कोर्टातून नोटरी करवून घेत आहेत. भोलू आणि रामकलीच्या या प्रेमकथेवरुन स्वर्गीय गायक जगजीत सिंह यांच्या एका गाण्यातील बोल नक्की आठवतात... 'ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन, जब प्यार करे कोई तो देखे केवल मन....'

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com