नाशिक - तुम्हीही अँड्रॉईड मोबाईल वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण तुमच्या मोबाईलमधून (Mobile) दररोज डेटा चोरी होत असून हा डेटा परस्पर गुगलकडे पाठवला जात असल्याचं निदर्शनास आलं आहे. सध्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर अथवा एखादी माहिती मिळवायची असेल तर आपण सहज गुगल सर्च करतो. आजच्या माहितीच्या महाजालात गुगल सर्च इंजिन सर्वांच्याचं परिचयाचं झालं आहे. मात्र गुगलच्या (google) डायलर अँड मेसेजेस या अँपच्या माध्यमातून युजर्सचा डेटा परस्पर गुगलकडे पाठवला जात असल्याचं निदर्शनास आलं आहे.
हे देखील पहा -
अँड्रॉईड युजर्सची प्रायव्हसी जपली जावी, युजर्सचा डेटा इतर कुणाला मिळू नये, यावर गुगल भर देत असलं, तरी गुगलच्या डायलर अँड मेसेज अँपमधून युजर्सचा डेटा विनासायास गुगलला प्राप्त होत असल्याचं समोर आलं आहे. युजर्सला येणाऱ्या मेसेजमध्ये बग्स आहेत का किंवा इतर त्रुटी शोधणं या मागचा गुगलचा उद्देश असल्याचं सांगितलं जातं असलं तरी हॅकर्सकडून हा डेटा डिकोड करण्याची अथवा चोरला जाण्याची शक्यताही नाकारता येत नसल्यानं गुगल अथवा कोणतंही मोबाईल अँप वापरतांना त्याच्या परमिशन, ऍक्सेस तपासण्याची तसच गरज नसलेले अँप काढून टाकण्याचा सल्ला सायबर तज्ञांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.