Gujarat News: मित्रांसोबत गरबा खेळताना २६ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Surat Boy Death After Heart Attack: गरबा खेळत असताना तरूणाला चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. या तरूणाला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयामध्ये हलवण्यात आले.
Surat Boy Death After Heart Attack
Surat Boy Death After Heart AttackSaam TV
Published On

Surat Boy Death After Heart Attack:

देशभरामध्ये सगळीकडे नवरात्रोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळाला. ठिकठिकाणी नवरात्रीनिमित्त गरबा (Garba 2023) आणि दांडियाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावत तरूण-तरुणींनी गरबा खेळण्याचा आनंद घेतला. पण अशात मित्रांसोबत गरबा खेळणं तरूणाच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका येऊन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुजरातच्या सूरत शहरामध्ये ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सूरतमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी गरबा खेळत असताना तरूणाला चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. या तरूणाला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषीत केले. या घटनेमुळे सर्वांना मोठा धक्का बसला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Surat Boy Death After Heart Attack
Panchkula Ravan Dahan: १७१ फूट उंच, १८ लाखांचा खर्च; पंचकुलात होणार रावणाच्या सर्वात उंच पुतळ्याचं दहन

रोहित राठोड (२६ वर्षे) असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रोहित सूरत शहरानजीकच्या बोनंद गावातील डूंगरी भागात आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. तो गावातील मित्रांसोबत गरबा खेळत होता. त्याचदरम्यान त्याला चक्कर आली. त्यामुळे घाबरलेले त्याचे मित्र आणि कुटुंबीय त्याला घेऊन सरकारी रुग्णालयामध्ये गेले. पण रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

Surat Boy Death After Heart Attack
Jharkhand Accident: दसऱ्याच्या दिवशी कुटुंबावर काळाचा घाला, कार कालव्यात कोसळून ५ जण जागीच ठार

डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगताच सूरजच्या कुटुंबीय आणि मित्रांना मोठा धक्का बसला. सूरजचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रोहितला कोणताच आजार नव्हता. त्याच्या पाश्चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. तो शेतामध्ये काम करायचा.

२१ ऑक्टोबरला देखील गुजरातमध्ये अशीच घटना घडली होती. गरबा खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने १७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झआला होता. २४ तासांमध्ये गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची ही १० वी घटना आहे.

Surat Boy Death After Heart Attack
Vladimir Putin: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका?, प्रकृतीबाबत मोठी अपडेट आली समोर...

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये देखील अशीच घटना आज समोर आली आहे. दुर्गा पंडालमध्ये गरबा खेळता खेळता एक तरुण जमिनीवर कोसळतो. या तरुणाला त्याचे मित्र आणि गावकरी तात्काळ रूग्णालयामध्ये घेऊन जातात. पण डॉक्टर त्याला मृत घोषीत करतात. उत्तर प्रदेशच्या लोरपूर ताजन गावातील ही घटना आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Surat Boy Death After Heart Attack
Bihar Stampade News : बिहारमध्ये देवीच्या दर्शनावेळी चेंगराचेंगरी; लहान मुलासह ३ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com