India Poverty Reduction: गेल्या 9 वर्षांत 24.82 कोटी भारतीयांची दारिद्रयातून मुक्तता: नीती आयोग

Indias Poverty Rate Drops: गेल्या नऊ वर्षांत 24.82 कोटी लोकांची बहुआयामी दारिद्रयातून मुक्तता झाली आहे.
Niti Aayog Report on Poverty
Niti Aayog Report on PovertySaam Tv
Published On

Niti Aayog Report On Poverty:

गेल्या नऊ वर्षांत 24.82 कोटी लोकांची बहुआयामी दारिद्रयातून मुक्तता झाली आहे. नीती आयोगाच्या ‘भारतातील बहुआयामी दारिद्रय 2005-06 पासून’ या चर्चा अभ्यासातील निष्कर्षांमध्ये, या कामगिरीचे श्रेय हे 2013-14 ते 2022-23 ता कालावधीत दारिद्रयाच्या सर्व पैलूंवर मात करण्यासाठी सरकारने राबवलेल्या महत्त्वपूर्ण उपक्रमांना देण्यात आले आहे.

नीती आयोगाचे सदस्य प्रा. रमेश चंद यांच्या हस्ते आज नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम यांच्या उपस्थितीत चर्चा अभ्यासाचे प्रकाशन करण्यात आले.ऑक्सफर्ड पॉलिसी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह (ओपीएचआय ) आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी ) यांनी या अभ्यासाठी तांत्रिक सहकार्य प्रदान केले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Niti Aayog Report on Poverty
Rahul Narwekar: 'मी कोणालाही संतुष्ट करायला निकाल दिला नाही', राहुल नार्वेकर यांनी नाव न घेता ठाकरेंना सुनावलं

बहुआयामी दारिद्रय निर्देशांक (एमपीआय ) हे जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त सर्वसमावेशक मोजमाप आहे. जे आर्थिक पैलूंच्या पलीकडे अनेक पैलूंमध्ये दारिद्रयाचे मूल्यांकन करते. एमपीआयची जागतिक कार्यपद्धती बळकट अल्किरे आणि फॉस्टर (एएफ ) पद्धतीवर आधारित आहे. जी तीव्र गरिबीचे मूल्यांकन करण्यासाठी रचना केलेल्या सार्वत्रिक मान्यताप्राप्त मापकाच्या आधारावर लोकांना गरीब म्हणून निश्चित करते.  (Latest Marathi News)

चर्चा अभ्यासानुसार, भारतातील बहुआयामी दारिद्रयात 2013-14 मधील 29.17% वरून 2022-23 मध्ये 11.28% पर्यंत म्हणजे 17.89 टक्के घट नोंदवली गेली आहे. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या नऊ वर्षात 5.94 कोटी लोक बहुआयामी दारिद्रयातून बाहेर पडले असून उत्तर प्रदेशमध्ये गरिबांच्या संख्येत सर्वात मोठी घट नोंदवली गेली आहे. त्यापाठोपाठ बिहारमध्ये 3.77 कोटी, मध्य प्रदेश 2.30 कोटी आणि राजस्थानमध्ये 1.87 कोटी लोकांची दारिद्रयातून मुक्तता झाली आहे.

Niti Aayog Report on Poverty
India Russia News: PM मोदींचा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना फोन, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली?

2005-06 ते 2015-16 (7.69% वार्षिक घट दर) या कालावधीच्या तुलनेत 2015-16 ते 2019-21 (10.66% वार्षिक घट दर ) या कालावधीत घातांक पद्धतीचा वापर करून दारिद्रय गणना गुणोत्तरात घट होण्याचा वेग जास्त होता हे देखील या अभ्यासात दिसून आले आहे. संपूर्ण अभ्यास कालावधीत एमपीआयच्या सर्व 12 निर्देशकांनी लक्षणीय सुधारणा नोंदवली आहे. सध्याच्या परिस्थितीशी (म्हणजे 2022-23 साठी) वर्ष 2013-14 मधील दारिद्रय पातळीचे मूल्यांकन करण्यासाठी, या विशिष्ट कालावधीसाठी डेटा मर्यादांमुळे अंदाजित अंदाज वापरले गेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com