कोरोना परततोय! 53 देशांनी चिंता वाढवली, आणखी एका लाटेची भीती

या भागात गेल्या आठवडाभरात १८ लाख नवे रुग्ण आढळून आले आहे. २४,००० जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना परततोय! 53 देशांनी चिंता वाढवली, आणखी एका लाटेची भीती
कोरोना परततोय! 53 देशांनी चिंता वाढवली, आणखी एका लाटेची भीतीSaam Tv
Published On

आशिया खंडातील ५३ देशांमध्ये काेराेनाने चिंतावाढवली आहे. या ५३ देशांमध्ये आणखी एका लाटेची भीती जागतिक आराेग्य संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे. या भागात गेल्या आठवडाभरात १८ लाख नवे रुग्ण आढळून आले आहे. २४,००० जणांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या विभागीय कार्यालयाच्या प्रमुख डॉ. हॅन्स क्लूज यांनी नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली आहे.

हे देखील पहा -

या ५३ देशांमध्ये कोरोनाची आणखी एक लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण या ५३ देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वेगाने वाढू लागला आहे. युराेप पुन्हा एकदा महामारीच्या केंद्रस्थानी आला आहे अशी माहिती त्याणी यावेळी दिली.डाॅ. क्लूज यांनी पुढे सांगितले की, संसर्ग राेखण्यासाठीचे उपाय आणि काही क्षेत्रात लसीकरणाचा कमी दर चिंतेचा विषय आहे.

कोरोना परततोय! 53 देशांनी चिंता वाढवली, आणखी एका लाटेची भीती
व्हॉट्सअ‍ॅपच्या Delete For Everyone फीचर्समध्ये होणार बदल!

आठवडाभरात मृतांचा आकडा १२ टक्क्यांनी वाढला असून तो २४ हजारांवर गेला आहे. तसेच १८ लाख नवे रुग्ण आढळले आहेत. यातही ६% वाढ झाली आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास फेब्रुवारीपर्यंत आणखी ५ लाख लाेकांचा महामारीमुळे मृत्यू हाेऊ शकताे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com