
Chatgpt Money Recovery : तुम्ही ChatGpt बाबत ऐकलं आहे का? सध्या जगभरात ChatGpt ची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. अनेकजण ChatGpt ला टेक्नॉलॉजी क्षेत्रातले भविष्य समजत आहे. तर काहीजण यावरून नोकरदारांसाठी धोका असल्याचंही म्हणत आहे. एकीकडे ChatGpt बाबत उलट सुटल चर्चा सुरू असताना, दुसरीकडे ChatGpt मुळे एका २३ वर्षीय तरुणाने आतापर्यंत २८ लाख रुपये कमावले आहे.
वाचून विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. ऑस्टिनमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने ही किमया करून दाखवली आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, लान्स जंक असं या २३ वर्षीय तरुणाचे नाव आहे. लान्स जंक याने एक ऑनलाइन कोर्स सुरू केला होता. ज्यामध्ये त्याने अनेक लोकांना ChatGPT कसे वापरायचे? याबाबतची माहिती दिली.
माहितीनुसार, तीन महिन्यात १५ हजारहून अधिक तरुणांनी लान्स जंक याने सुरू केलेला कोर्स जॉईन केला. लान्स जंकने दाखवलेली क्षमता ChatGpt ने ओळखली. या मोबदल्यात त्याला ३५००० डॉलर्स म्हणजेच आतापर्यंत २८ लाख रुपयांचा नफा मिळवून दिला.
ChatGpt बाबत माहिती देताना लान्स म्हणाला, हा बॉट सर्वांना उपलब्ध व्हावा अशी माझी इच्छा होती. ChatGpt बद्दल शिकण्यास त्यांना वाव मिळावा, यासाठी मी विशेष प्रयत्न केले होते. लान्स म्हणाला, ‘मला वाटते की अनेक लोक ChatGPT ला घाबरतात, म्हणून मी ते सर्वांना वापरायला आवडेल असा बनवण्यासाठी प्रयत्न केला.’
लान्सने दिलेल्या माहितीनुसार, ChatGPT बॉटसोबत तो सुरूवातीला तासनतास वेळ घालवत होता. यावरून तो लोकांना कादंबरीसाठी प्रस्तावना लिहायला सांगायचा. तर कधी एखाद्या उत्पादनाचे वर्णन करायला सांगायचा. हळूहळू लान्सने ChatGPT वर कोर्स सुरू केला. हा कोर्स ७ तासांचा असून त्याची किंमत २० डॉलर इतकी होती.
यामध्ये ५० व्याख्यानांचा समावेश होता. ही सर्व व्याख्याने तयार करण्यासाठी लान्सला ३ आठवडे लागले होते. चॅटजीपीटी प्रॉम्प्ट कसे लिहिलेले असतात, यापासून सुरुवात होते. तर पुढे व्यवसाय, विद्यार्थी आणि प्रोग्रामरसाठी विशिष्ट चॅटजीपीटी अॅप्लिकेशन्सबद्दल सांगण्यात आलं आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.