तिरुअनंतपुरम : आईवर बलात्काराचा प्रयत्न केला म्हणून दोन बहिणींनी आत्याच्या नवऱ्याची हत्या केली आहे. केरळमध्ये हा धक्कादायक घटना घडली आहे. 70 वर्षांच्या आत्याच्या नवऱ्याचा दोन अल्पवयीन मुलींनी हत्या केली आहे. 15 आणि 16 वर्षाच्या दोघी बहिणींनी काकाची हत्या करुन त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिलं. हत्या केल्याचं त्यां दोघींनी स्वत: पोलिसांना (Police) सांगितलं असून अंबालवयाल पोलिसांमध्ये त्या दोघींनी आत्मसमर्पण केलं.
2 अल्पवयीन बहिणींनी सांगितले की, त्या दोघी घरात खेळत असताना आपल्या आत्याचा नवरा आईवरती जबरदस्ती करत असल्याचं त्यांनी पाहिलं आणि ते पाहताच त्या दोघींनी काकाला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकत नसल्याने दोघीं बहिणींनी मिळून त्याला ठार केलं. आणि हत्येनंतर (Murder) काकाचा मृतदेह विहिरीत फेकला असल्याचही त्यांनी सांगितलं.
हे देखील पहा -
मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली आणि या घटनेनंतर या दोघींनी आईच्या मदतीने मृतदेह एका गोणीत भरला आणि विहिरीत फेकून दिला. असही त्यांनी सांगितलं, मृत व्यक्तीच्या 2 पत्नी आणि मुलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुलींच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.