Corona Cases Today : देशाला मोठा दिलासा! गेल्या 24 तासांत 1778 कोरोनाचे नवे रुग्ण, 62 मृत्यू

देशात गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णांमध्ये 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Corona Cases Update in India | Corona patient Updates
Corona Cases Update in India | Corona patient UpdatesSaam TV
Published On

वृत्तसंस्था: देशात गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांमध्ये ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. गेल्या २४ तासामध्ये देशामध्ये कोरोना विषाणूचे १ हजार ७७८ नवीन रुग्ण आढळले आहेत तर ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. काल १ हजार ५८१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आणि ३३ जणांचा मृत्यू झाला होता. देशामध्ये आतापर्यंत ४ कोटी ३० लाख १२ हजार ७४९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.(Corona Cases Update in India)

हे देखील पहा-

आतापर्यंत भारतात एकूण कोरोना मृतांची संख्या ५ लाख १६ हजार ५४३ झाली आहे. आतापर्यंत १८१ कोटींपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे १८१ कोटींपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. सोमवारी दिवसभरामध्ये ३० लाख ५८ हजार ८७९ डोस देण्यात आले आहेत.

त्यानंतर आतापर्यंत एकुण १८१ कोटी ५६ लाख १ हजार ९४४ डोस कोरोना (Corona) लसीचे (vaccines) डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना २ कोटीपेक्षा जास्त प्रतिबंधात्मक लस देण्यात आले आहेत. १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटासाठी बूस्टर डोस देण्यात येत आहे.

Corona Cases Update in India | Corona patient Updates
बनावट फेसबुक अकाउंट उघडून महिलेची बदनामी करणाऱ्या आरोपीस अटक

जगात अनेक भागांमध्ये कोरोनाच्या संसर्गाच्या रुग्णांमध्ये झाली असलेली वाढ आणि आंतरराष्ट्रीय प्रवासामध्ये येणाऱ्या समस्या बघता, सरकार १८ वर्षांवर सर्वाना कोरोना लसीचा बूस्टर (Booster) डोस देण्याच्या विचारात आहे. सूत्रांनी सोमवारी ही माहिती दिली आहे. सध्या आरोग्य कर्मचारी, आघाडीचे कर्मचारी आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना कोरोना लसीचे बूस्टर डोस दिले जात आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com