
Bihar News: बिहारमध्ये दारुपायी (Bihar Liqour) अनेकांनी आपला जीव गमावला आहे. बिहारच्या मोतिहारीमध्ये विषारी दारु (Poisonous Liquor) पिऊन आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आतापर्यंत बिहार पोलिसांनी (Bihar Police) 20 जणांना अटक केली आहे. याप्रकरणाचा बिहार पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे.
बिहारमध्ये दारूबंदी असताना सुद्धा पुन्हा एकदा बनावट दारू मोठ्याप्रमाणात विकली जात आहे. बिहारच्या पूर्व चंपारणमध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 20 जणांना अटक केल्याचा दावा केला आहे.
तर, बिहारमधील प्रमुख विरोधी पक्ष भाजपने सरकारवर दारूमुळे होणाऱ्या मृतांची संख्या लपवल्याचा आरोप केला आहे. भाजपने आतर्यंत 25 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. पण प्रशासन मृतांचा आकडा 14 असल्याचे सांगत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
बनावट दारु प्रकरणी बिहार पोलिसांनी आतापर्यंत 20 जणांना अटक केली आहे. बिहारच्या मोतिहारीमधील वेगवेगळ्या गावांमधून मोठ्या प्रमाणात बनावट दारू जप्त करण्यात आली आहे. विषारी दारु प्यायल्यामुळे आतापर्यंत 25 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. यामधील पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
तुर्कौलिया गावातील स्थानिक नागरिकांनी सांगितले की, गुरुवारी रात्री काही लोकांनी कच्ची दारू प्यायली होती. त्यातील अनेकांचा मृत्यू झाला. गावकऱ्यांनी मृतांवर अंतिम संस्कार केले आहेत. तर काही लोकांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुर्कौलिया येथे वैद्यकीय पथके पाठवण्यात आली होती. तसंच शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये विशेष नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांसह घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. जेणेकरून आजारी व्यक्तीवर योग्य उपचार करता येतील.
दरम्यान, बिहार पोलिस विभाग आणि दारूबंदी विभागाकडून सखोल छापेमारी सुरू आहे. याप्रकरणी आतापर्यंत 20 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. तर 11 मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.