आपण ओळखलं जावं आणि आपल्याला प्रसिद्धी मिळावी यासाठी अनेकजण वेगवेगळे स्टंट करत असतो. सध्या रिल्स बनवून प्रसिद्ध होण्याच फॅड अनेकांच्या डोक्यात भरलंय. यासाठी अनेकजण वेगवेगळ्या कलाकृत्या करताना दिसत असतात. कोणी लोकल रेल्वेमध्ये डान्स करत, तर कोणी मेट्रोमध्ये नको त्याप्रकारची कृती करून लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु प्रसिद्धी होण्याच्या हाव जिवावर बेतू लागलीय. याची प्रचिती हरिणायातील एका घटनेने झालीय. हरियाणातील २२ वर्षीय युट्यूबरला व्हिडिओसाठी स्टंट करताना आपला जीव गमावावा लागलाय. (Latest News)
निशू देशवाल हा २२ वर्षीय युट्यूबर होता. सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह होता. त्याला १४ लाख सब्सक्रायबर्स असल्याचं सांगितलं जातं आहे. सोशल मीडियावर तो स्टंटबाजीचे व्हिडिओ पोस्ट करायचा. त्याचे ते व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असायचे. या व्हिडिओमुळे तो सोशल मीडियावर स्टार झाला होता. परंतु याच व्हिडिओमुळे त्याला जीव गमावावा लागेल असं कधी वाटलं नसले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मिळालेल्या माहितीनुसार, निशू देशवाल हा सोशल मीडियावर ट्रॅक्टरचा स्टंट करत होता. त्यादरम्यान अपघात झाला आणि त्याला जीव गमवावा लागला. स्टंट करताना झालेला व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. निशू ट्रॅक्टर मागील दोन चाकावर चालवण्याचा स्टंट करत होता. तो व्हिडिओ तो सोशल मीडियावर टाकणार होता. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये निशू ट्रॅक्टर मागील दोन चाकांवर बॅलन्स करताना दिसत आहे.
परंतु त्याचवेळी ट्रॅक्टर पलटी होतो आणि निशू स्टेअरिग आणि सीटमध्ये अडकतो. ट्रॅक्टर अंगावर पडल्याने निशूचा मृत्यू झाला. निशू एक स्टंटमॅन होता. दीड वर्षापूर्वीच निशूचा विवाह झाला होता, त्याला सहा महिन्याचा एक मुलगा आहे. निशूला दोन भाऊ असून तो सर्वात लहान भाऊ होता. निशू देशवाल याचे वडील शेती करतात. निशू आपल्या मित्रांसोबत नदीच्या किनाऱ्यावर रिल व्हिडिओ बनवत होता.
निशूचा YouTube वर HR-PB Tractors नावाचा स्वतःचा एक चॅनल होता. यूट्यूबवर त्यांचे 13 लाख 60 हजार फॉलोअर्स होते. यूट्यूबरच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरलीय. निशू अनेकदा स्टंट करत असल्याचे व्हिडिओ शेअर करत असायचा. पण त्याचा स्टंट एके दिवशी त्याच्या मृत्यूचे कारण बनेल असे त्याला कधीच वाटले नसेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.