125 Passengers Covid Positive: इटलीहून विमानात आलेले 125 प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह

इटलीहून (Italy) आलेल्या आंतरराष्ट्रीय चार्टर्ड फ्लाइटच्या 125 प्रवाशांची अमृतसर विमानतळावर आगमन झाल्यावर कोविड-19 साठी चाचणी पॉझिटिव्ह (Covid Positive) आली आहे.
125 Passengers Covid Positive
125 Passengers Covid PositiveTwitter/@ANI

अमृतसर - इटलीहून (Italy) आलेल्या आंतरराष्ट्रीय चार्टर्ड फ्लाइटच्या 125 प्रवाशांची अमृतसर विमानतळावर आगमन झाल्यावर कोविड-19 साठी चाचणी पॉझिटिव्ह (Covid Positive) आली आहे. अमृतसर विमानतळ संचालक व्ही. के. सेठ यांनी विमानामध्ये एकूण 179 प्रवासी होते अशी माहिती दिली आहे.

179 प्रवाशांपैकी 125 प्रवाशांना कोरोना -

राजासांसी आंतरराष्ट्रीय विमानतळावर इटलीहून आलेल्या फ्लाइटमधील 179 प्रवाशांपैकी 125 प्रवाशांना कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मात्र, प्रवाशांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर विमानतळावर आलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांचा एकच गोंधळ उडाला होता.

125 Passengers Covid Positive
रश्मी ठाकरे आणि अजित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट; भाजप पदाधिकारी अटकेत (Video)

प्रवाशांचे कुटुंबीय काय म्हणाले?

रोम, इटली येथून विमानात चढत असताना त्यांची चाचणी करण्यात आली होती, जी 72 तासांसाठी वैध होती. त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना विमानात बसवण्यात आले होते असे त्यांनी सांगितल. पण आज ते अमृतसर विमानतळावर आल्यावर जेव्हा त्यांनी तपासणी करण्यात आली तेव्हा त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली. आमच्यावर दबाव टाकला जात आहे, आणि तो आम्ही सहन करणार नाही, असे ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com