Gas Leak Visakhapatnam Andhra Pradesh : विशाखापट्टणममध्ये विषारी गॅस गळती; १०० हून अधिक कर्मचारी रुग्णालयात

विशाखापट्टणममध्ये विषारी गॅस गळती झाल्याने शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांना बाधा झाली.
Visakhapatnam Gas Leak Andhra Pradesh News / ANI
Visakhapatnam Gas Leak Andhra Pradesh News / ANISAAM TV
Published On

विशाखापट्टणम: आंध्र प्रदेशातील औद्योगिक क्षेत्रात पुन्हा एका मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत सव्वाशेच्या आसपास नागरिकांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Gas Leak Visakhapatnam Andhra Pradesh Update News)

विशाखापट्टणमजवळ (Visakhapatnam) ही वायू गळतीची दुर्घटना घडली. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीतील ही गॅस गळतीची (Gas Leak) दुसरी दुर्घटना आहे. राज्याचे मंत्री अमरनाथ यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत कंपनी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

गॅस गळतीनंतर (gas leakage) कर्मचाऱ्यांमध्ये घबराट उडाली. गॅस गळतीमुळे बाधा झाल्याने काही कर्मचाऱ्यांना उलटीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना स्पेशल इकॉनॉमिक झोनमधील मेडिकल सेंटरमध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले.

ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. ही कंपनी अनकपल्ली जिल्ह्यातील अच्युतपुरम परिसरात आहे. विषारी गॅस गळतीनंतर ५० महिलांना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. मात्र, आता हीच संख्या वाढून सव्वाशेच्या आसपास झाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी सव्वासहा ते सात वाजताच्या दरम्यान घडली. दुपारी २ ते रात्री १० या शिफ्टमध्ये जवळपास हजार कर्मचारी ड्युटीवर होते. सुरुवातीला उलटीचा त्रास झालेल्या ५० महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उर्वरीत सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

परिस्थिती नियंत्रणात आहे. काही कर्मचाऱ्यांमध्ये सौम्य लक्षणे दिसून आली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गॅस गळतीमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.

अशाच प्रकारची गॅस गळतीची घटना जूनमध्ये घडली होती. त्यावेळी २०० हून अधिक महिला कर्मचाऱ्यांच्या (Employee) डोळ्यांत जळजळ आणि त्यांना उलटीचा त्रास झाला होता. बाधेमुळे काही महिला बेशुद्ध पडल्या होत्या. अशा प्रकारची दुर्घटना दुसऱ्यांदा घडली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

हैदराबादच्या भारतीय रासायनिक प्रौद्योगिकी संस्थेच्या विशेषज्ज्ञांचे पथक प्रयोगशाळेत पोहोचले. त्यांनी गॅस गळतीचे कारण काय आहे, याची माहिती मिळवण्यासाठी पाहणी केली. तर आंध्र प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रयोगशाळा बंद करण्याचे आदेश दिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com