Pixie's Pix : पोरीनं कमालच केली! 11व्या वर्षी बिझनेसमध्ये करोडोंची उलाढाल; आता निवृत्तीची घोषणा

एका महिन्यात मोठी कमाई करणाऱ्या 11 वर्षीय पिक्सी कर्टिसकडे मर्सिडीज कारही आहे.
Pixie
PixieSaam TV
Published On

Viral News : करिअरचा ग्राफ साधारण शिक्षण नोकरी किंवा व्यवसाय त्यात प्रगती आणि त्यानंतर मग निवृत्ती असा असतो. मात्र अवघ्या 11 वर्षांची एक मुलगी आता कामातून निवृत्ती घेऊन शिक्षणावर लक्ष केंद्रीय करणार आहे. कमी वयात प्रसिद्धी मिळवणारे लोक खूप कमी असतात. पिक्सी त्यापैकीच एक आहे.

पिक्सी एका महिन्यात 1 कोटींहून अधिकची कमाई करते. पण आता ही मुलगी लवकरच निवृत्त होणार आहे. पिक्सी निवृत्त होऊन तिच्या शालेय शिक्षणावर लक्ष केंद्रित करणार आहे. एका महिन्यात मोठी कमाई करणाऱ्या 11 वर्षीय पिक्सी कर्टिसकडे मर्सिडीज कारही आहे. (Latest News)

Pixie
Akshay Kumar: हवेत उडणारा अक्षय फ्लॉप सिनेमांमुळे नरमला.. चूक मान्य करत मागितली प्रेक्षकांची माफी

पिक्सी Pixie's Pix नावाची कंपनी ती चालवते. ही एक ऑनलाइन कंपनी आहे. ही कंपनी विविध प्रकारचे हेअर बो, हेडबँड विकते. पिक्सीची कंपनी आणि व्यवसाय तिची आई रॉक्सी जेसेन्को यांनी सुरू केला होता. रॉक्सी स्वतः देखील एक बिझनेस वुमन आहेत.

Roxy ने news.com.au ला सांगितले, पिक्सीला आता हायस्कूलवर लक्ष केंद्रित करायचे आहे. यामुळे ती हे काम करणार नाही. आम्हीही गेल्या अनेक महिन्यांपासून याचा विचार करत होतो. पिक्सीने सुमारे तीन वर्षांपूर्वी हा व्यवसाय सुरू केला.

Pixie
Sonia Gandhi : राजकारणातून निवृत्त होण्याच्या चर्चांवर सोनिया गांधी यांचं मोठं विधान; म्हणाल्या, 'मी कधीच...'

पिक्सीला तिची आई रॉक्सीने तिच्या 10 व्या वाढदिवशी 2.25 कोटी रुपयांची मर्सिडीज कार भेट दिली त्यावेळी ती अचानक प्रकाशझोतात आली होती. पिक्सीच्या 11 व्या वाढदिवसाची सोशल मीडियावर देखील चर्चा होती. या वाढदिवसावर 30 लाखांहून अधिक रुपये खर्च करण्यात आले होते.

पिक्सी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 1 लाख 21 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. इन्स्टावर ती सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. याशिवाय ती तिच्या व्यवसायाशी संबंधित गोष्टीही शेअर करते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com