Punjab: भगंवत मान यांची टीम तयार,10 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

मंत्रिमंडळात जुन्या चेहऱ्यांऐवजी नव्या आमदारांना संधी देण्यात आली आहे.
Punjab News
Punjab NewsTwitter/@ANI
Published On

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या दणदणीत विजयानंतर भगवंत मान यांनी १६ मार्च रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनतर आज त्यांच्या 10 मंत्र्यांनीही शपथ घेतली. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना शपथ दिली. मान मंत्रिमंडळात जुन्या चेहऱ्यांऐवजी नव्या आमदारांना संधी देण्यात आली आहे. त्यापैकी एक महिला मंत्रीही आहे.

शपथविधी कार्यक्रम चंदीगड येथील राजभवनात पार पडला. मंत्रिपदाची शपथ घेणार्‍यांमध्ये ज्येष्ठ नेते हरपाल सिंग चीमा हे प्रमुख आहेत. याशिवाय हरभजन सिंग इटो, लाल सिंग कात्रोचक, विजय सिंगला, गुरमीत सिंग मीत हायर, कुलदीप सिंग धालीवाल, ब्रह्म शंकर, लालजीत सिंग भुल्लर आणि हरजोत सिंग बैंस यांचा समावेश आहे. हरजोत सिंग बैंस हे मान मंत्रिमंडळातील सर्वात तरुण सदस्य आहेत. मंत्रिमंडळात बलजीत कौर या एकमेव महिला आहेत.

Punjab News
Accident: कर्नाटकात बस उलटून ८ जणांचा मृत्यू; २० प्रवासी गंभीर

आज होणार मंत्रिमंडळाची पहिली बैठक?

मान मंत्रिमंडळाची पहिली बैठकही दुपारीच होऊ शकते. आजपासूनच सर्व मंत्री पदभार स्वीकारून कामाला लागतील. 117 विधानसभेच्या राज्यात आम आदमी पक्षाने 92 जागा जिंकल्या आहेत. 10 पैकी चार मंत्री अनुसूचित जातीचे आहेत. याशिवाय तीन मंत्री हिंदू आणि तीन जाट शीख आहेत. मान मंत्रिमंडळात आणखी 6 चेहऱ्यांचा समावेश केला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. त्यात असे आठ आमदार आहेत जे पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचले आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com