Mumbai University: मुंबई विद्यापीठ आणि त्याअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांची नामफलकं मराठीत करा, युवासेनेची मागणी

इतर सूचनाफलकं हे दुकानांच्या पाट्यांप्रमाणे मराठीत असावे, ही प्रमुख मागणी आहे.
Mumbai University
Mumbai UniversitySaam Tv
Published On

रश्मी पुराणिक -

मुंबई: मराठीचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार होण्यासाठी विद्यापिठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेमध्ये युवा सेनेकडून स्थगन प्रस्ताव मांडून काही महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्यात. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे मुंबई विद्यापीठ आणि त्या अंतर्गत येणारी महाविद्यालयातील नामफलकं तसेच, इतर सूचनाफलकं हे दुकानांच्या पाट्यांप्रमाणे मराठीत असावे, ही प्रमुख मागणी आहे (Yuvasena demands to change nameplates of Mumbai University and the colleges under it in Marathi language).

Mumbai University
Mumbai Local: लोकलची गर्दी वाढली; दररोज तब्बल ६० लाख प्रवाशी करतायत लोकलवारी...

त्यासंदर्भात आज विद्यापीठ प्रशासनाला (Mumbai University) युवासेना सिनेट सदस्याकडून निवेदन देण्यात येणार असून या संदर्भात तातडीने परिपत्रक काढून महाविद्यालयांची नामफलकं मराठीत करण्यात यावेत अशा प्रकारचा आग्रह केला जाणार आहे.

प्रस्तावातील मागण्या काय?

  • विद्यापीठ पातळीवर मराठी भाषा विकास मंडळाची स्थापना करावी आणि त्याला उचित अर्थ सहाय्य देण्यात यावे.

  • प्रत्येक महाविद्यालयात मराठी (Marathi) वांड्मय मंडाळाची स्थापना अनिवार्य करुन मंडाळाच्या कार्यक्रमांसाठी आर्थिक तरतुद करावी.

  • मराठी ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ दिंडी यासारखे उपक्रम राबवणे

  • महाविद्यालयांच्या नावाचे फलक तसेच इतर सूचना फलक मराठीमध्ये असावेत.

  • महाविद्यालयांचे प्रवेश अर्ज, माहिती पुस्तिका, भित्ती पत्रके, प्रश्न पत्रिका इत्यादी सर्व मराठी भाषेत उपलब्ध करण्यात यावे.

  • काही विषयांच्या परीक्षा मराठी माध्यमातून देण्याची सोय करावी.

  • मराठी भाषेतून PH.D करण्यासाठी प्रोत्साहनदायी उपाय योजना कराव्यात.

  • मराठी भाषेचा वापर वाढवण्यासाठी विद्यापीठ पातळीवर ठोस धोरण आखावे.

वरील मागण्या मान्य करुन लवकरच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याच्या मोहिमेत सहभागी होण्याचे परीपत्रक आणि इतर परीपत्रकं काढण्याचे आश्वासन कुलगुरुंनी दिले आहे. आश्वासन जरी दिले असले तरी युवासेना सिनेट सदस्य आणि आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत त्याचा पाठपुरावा करायचे ठरवले आहे. त्यामुळे युवासेना सिनेट सदस्य विद्यापीठ प्रशासन कुलगुरुंची भेट घेऊन या संदर्भात तातडीने परिपत्रक काढावे, या संदर्भात निवेदन देणार आहे.

त्यामुळे यासंदर्भात निर्णय झाल्यास दुकाने, कार्यालयीन पाट्या त्यानंतर आता मुंबईतील कॉलेजेसची नामफलकं सुद्धा मराठीत पाहायला मिळतील.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com