Hamida Banu: २२ वर्षं पाकिस्तानात, युट्यूबमुळे परतल्या भारतात; कशा सापडल्या मुंबईच्या हमीदा बानू?

Missing Indian Woman Found in Pakistan: कुर्ल्याच्या हमिदा बानो पाकिस्तानात अडकल्या, २२ वर्षांनंतर युट्यूबमुळे मायदेशात परतल्या; व्हायरल व्हिडिओमुळे आई-मुलांची भेट घडली.
Missing Indian Woman
Missing Indian WomanMissing Indian Woman
Published On

पाकिस्तानातील एक युट्यूबर तिथं अडकलेल्या एका भारतीय महिलेचा व्हिडिओ काढतो. तो व्हिडिओ व्हायरल होतो काय आणि तब्बल २२ वर्षांनंतर ती महिला मायदेशी परतते काय. एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखी मुंबईतील हमीदा बानूंची कहाणी आहे. त्यांची ही कहाणी सध्या सोशल माध्यमांमध्ये चांगलीच व्हायरल होत आहे.

साल होतं २००२ आपल्या पोटच्या मुलांसाठी मुंबईतील कुर्ला भागातील हमीदा बानु दुबईला काम करण्यासाठी गेल्या होत्या.मात्र त्यांचं दुर्दैव असं की त्यांची फसवणूक झाली. मानवी तस्करीच्या जाळ्यात अडकलेल्या हमिदा थेट पाकिस्तानात पोहोचल्या. परकीय देश त्यात आपल्याला ओळखणारा कोणी नाही. मदत करणारा कोणीही नाही. परतीचा मार्ग नाही. अशा दुष्टचक्रात त्या अडकून पडल्या आणि वयाची २२ वर्ष अशीच निघून गेली. मात्र, पाकिस्तानातील एक युट्युबर त्यांच्या मदतीला आला आणि अशक्य गोष्ट शक्य झाली.

Missing Indian Woman
Viral Video: चोरीचा नवीन फंडा! स्कुटीवरून कुंडी चोरणाऱ्या महिलेचा VIDEO व्हायरल

परतीचे सगळे मार्ग बंद झालेले असताना अचानक..

वालिउल्ल मारूफ नावाचा यूट्यूबर देवदूता सारखा त्यांच्या आयुष्यात आला. हमिदा यांची कहाणी ऐकून तो देखील हेलावून गेला. त्यानं हमिदा आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घडवून आणण्याचा निश्चय केला. त्यानं हमिदा यांचा व्हिडिओ बनवला. त्यात हमिदा कोण, कुठल्या आहेत, त्यांच्या मुलांची नावे या सगळ्याचा उलगडा केला. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल होत थेट कुर्ला कुरेशी नगर येथील त्यांच्या मुलांपर्यंत पोहोचला आणि दोन दशकांचा शोध अखेर संपला.

Missing Indian Woman
Viral Cricket Video: १२ वर्षीय सुशीलाची जादुई गोलंदाजी; क्रिकेटच्या देवाने दिली दाद -VIDEO

भारताचा शत्रू अशी पाकिस्तानची ओळख आहे. भारताविरोधात सतत कारस्थानं रचणे हे पाकिस्तानचे उद्योग आहेत असं म्हटलं जातं. त्याच पाकिस्तानच्या जनतेने मात्र भारताच्या हमीदा यांना सांभाळून घेतलं. त्याचा त्या आवर्जून उल्लेख करतात.

दोन दशकांहून अधिक वर्ष पाकिस्तानात अडकून पडलेल्या हमिदा बानूंनी अखेर पाकिस्तानात संसार थाटला. मात्र आपल्या मुलांची ओढ त्यांना कायम सतावत होती. पुन्हा भारतात आपल्या कुटुंबीयांकडे परतण्याची त्यांना आस लागली होती. दोन दशकांनी का होईना पण मायदेशात परतण्याचं त्यांच स्वप्न अखेर पूर्ण झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com