10th, 12th Student Protest:"चुकीची माणसं आंदोलनात असू शकतात"- बच्चू कडू

काही विद्यार्थी रस्त्यावर आले म्हणजे सर्वच सर्वच विद्यार्थ्यांचं म्हणणं नाही
Bachchu Kadu
Bachchu KaduSaam Tv
Published On

मुंबई: दहावी- बारावीच्या परीक्षा ऑनलाईन (10th And 12th Exams) घ्याव्यात अशी मागणी घेऊन राज्यात अनेक ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. पुणे, नागपुर, औरंगाबाद, अकोला आणि मुंबईमधील काही ठिकाणी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. यानंतर राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारची बाजू मांडली आहे. हिंदुस्तानी भाऊ (Hindustani Bhau) म्हणून कुणीतरी आंदोलनाची सुरूवात केली आहे. त्यांची मागणी आम्ही जाणून घेणार आहे. (Maharashtra Board Students Demand Online Exams)

हे देखील पहा-

मात्र, कुणी देखील अशी मागणी करायची गरज नाही, शिक्षण विभाग त्याकरिता तत्पर आहे, असे बच्चू कडू (Bachchu Kadu) यावेळी म्हणाले आहेत. तसेच काही विद्यार्थी (Student) रस्त्यावर आले म्हणजे, सर्व विद्यार्थ्यांचे असेच मत आहे, असे म्हणता येणार नाही. ज्यांचा शिक्षणाशी काही देखील संबंध नाही. त्या लोकांचा देखील या आंदोलनामध्ये सहभाग असल्याची शक्यता आहे. पोलिसांनी (police) देखील आंदोलन अतिशय व्यवस्थित हाताळावे असे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Bachchu Kadu
Imtiaz Jalil On Wine Decision:...तर वाईनची दुकाने फोडणार; खासदार इम्तियाज जलील आक्रमक...(पहा व्हिडिओ)

२ वर्षामध्ये कोरोनामुळे (corona) मृत्यू झाले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचे देखील मृत्यू झाले आहेत. या धक्क्यातून कुटुंब (Family) अजून सावरले नाही. आता ओमिक्रॉन आला आहे. स्वतः सरकार म्हणतय की घरात राहा, काळजी घ्या. मग सरकार विद्यार्थ्यांचा बळी का देत आहे? प्रोफेसर ऑनलाइन (Online) बैठक घेत आहेत. तुम्हाला तुमच्या जीवाची काळजी आहे, तर विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ का? असा सवाल हिंदुस्थानी भाऊने त्याच्या व्हिडिओमधून केला आहे.

अशा परिस्थितीमध्ये शासन विद्यार्थ्यांचा विचार न करता दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेत आहे. यामुळे या परीक्षा रद्द करण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com