Imtiaz Jalil On Wine Decision:...तर वाईनची दुकाने फोडणार; खासदार इम्तियाज जलील आक्रमक...(पहा व्हिडिओ)

राज्य सरकारने किराणा दुकाने आणि सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे, पण या निर्णयाला विरोधी पक्षांकडून तीव्र विरोध होताना दिसून येत आहे.
Imtiaz Jalil On Wine Decision
Imtiaz Jalil On Wine DecisionSaam TV
Published On

औरंगाबाद: काही दिवसाअगोदरच राज्य सरकारने राज्यात किराणा दुकाने आणि सुपरमार्केटमध्ये वाईन (Wine) विक्रीला परवानगी दिली आहे. पण, या निर्णयाचा भाजप आणि MIM ने विरोध केला आहे. औरंगाबादचे MIMचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी या निर्णयाला कडकडून विरोध केला आहे. तीव्र शब्दात सरकारला (government) इशारा दिला आहे.

पहा व्हिडिओ-

मीडियाशी बोलताना इम्तियाज जलील म्हणाले आहेत की, औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात कुठल्याही दुकानात वाईन विकू देणार नाही. अशा दुकानांचे शिवसेनेच्या (Shiv Sena) नेत्यांनी उद्घाटन करावे, ती दुकाने आम्ही फोडून काढणार आहार, असे खुले आव्हान सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना देण्यात आला आहे.

Imtiaz Jalil On Wine Decision
Nashik: बिबट्याचा नागरिकांवर हल्ला; वनविभागाची शोध मोहीम सुरु...(पहा व्हिडिओ)

राज्य सरकारने शेतकऱ्यांना (farmers) प्रोत्साहन देण्याकरिता हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. पण, शेतकऱ्यांना प्रोत्साहनच द्यायचे झाल्यास, वाईनऐवजी दूध आणि शेतीसंबंधी गोष्टींना महत्वा द्यावे, असे जलील यांनी यावेळी म्हणाले आहेत. राज्य शासनाने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा एमआयएमच्या कार्यकर्त्ये जिथे कुठे सुपरमार्केटमध्ये वाईनची दुकाने दिसणार आहेत. ते तात्काळ फोडण्यात येणार आहेत, असा इशारा जलील यांनी यावेळी दिला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com