संदीप काळे यांच्या तीन पुस्तकांचे होणार प्रकाशन! २३ जुलैला पुण्यात कार्यक्रम

३६ महिलांचा 'महाराष्ट्राची सावित्री' पुरस्कार देऊन सन्मान!
Woman Power Book Of Sandip Kale
Woman Power Book Of Sandip Kalesaam tv
Published On

पुणे : संपादक, लेखक, संघटक, निवेदक असणाऱ्या संदीप काळे (Sandip Kale) यांच्या ‘वूमन पाॅवर’ (woman Power book) तिच्या कर्तृत्वाची सक्सेस स्टोरी या मराठी, हिंदी, आणि इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (ता23) पुण्यामध्ये होत आहे. महिलांसाठी प्रेरणा (inspiration to woman) देणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, या सोहळ्यात ३६ महिलांना 'महाराष्ट्राची सावित्री' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

Woman Power Book Of Sandip Kale
उद्धव ठाकरे यांना कधीच मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, पण....; शिवसेना खासदार स्पष्टच बोलले

महाराष्ट्रात आपल्या सेवाभावी कामाने जनसामान्यांवर छाप पाडणार्‍या महिलांवर संदीप काळे यांनी ‘सावित्रीचा जागर’ या लेखमालेच्या माध्यमातून प्रकाश टाकला होता. या महिलांचे काम सर्वदूर जावे, या उद्देशाने 'सकाळ प्रकाशना'ने संदीप काळे यांच्या ‘वूमन पाॅवर’ तिच्या कर्तृत्वाची सक्सेस स्टोरी या मराठी, हिंदी, इंग्रजी, अशी तीन पुस्तके प्रकाशनासाठी सज्ज केली आहेत. या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा येत्या २३ जुलै रोजी 'हॉटेल मेरीगोल्ड' बावधन, पुणे येथे दुपारी २ वाजता होणार आहे.

राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे असणार आहेत. पद्मश्री पोपटराव पवार, लेखक-पत्रकार सुरेखा पवार, अभिनेते अजय पुरकर उपस्थित राहणार आहेत.

Woman Power Book Of Sandip Kale
जिलेबी कितीही आडवळणी असो....; अमृता फडणवीसांच्या उपमुख्यमंत्र्यांना वाढदिवसानिमित्त गोड शुभेच्छा

रेवती पार्डीकर-गव्हाणे, शिल्पा फलफले शेटे, विजयमाला गिरी-पुरी, टीना शहा-धरमसी, माधवी ठाकरे, राजश्री महल्ल्ले-पाटील, प्राचार्य डॉ. रेखा शेळके-धावडे, दुर्गा गुडिलू, लत्ता उमाळे-तायडे, मीरा ढास, डॉ.रागिणी पारेख, रिता पाटील-माहोरे, मुक्ता काटकर-भोसले, रेणुका कड, प्रा. डॉ. सविता गिरे -पाटील, सारिका पन्हाळकर-महोत्रा, डॉ. रजनी होनमुटे-भाजीभाकरे, डॉ. कांचन पाटील-वडगावकर, प्रांजली ऊर्फ मयुरी मद्रेवार-बोरलेपवार, शर्मिष्ठा जाधव, झरीन गुप्ता, स्वप्ना कुलकर्णी-राठोड, लीलावती ऊर्फ लीला चौहान-शिंदे, श्रेया भिडे-भारतीय, सुनिता भाबड-नागरे, स्वप्ना ठाकूर-पाटील, अश्विनी ऊर्फ गौरी डावकर-मोरे, प्रिया मनाठकर-बंडेवार, विजयालक्ष्मी शिवनगावकर-रामोड, डॉ. पल्लवी रामनाथ दिघुळे-मुंडे, शिल्पा चेऊलवार-गंजेवार, शीतल तेजवाणी-सूर्यवंशी, इंदूबाई पानसरे-गावडे, स्वाती जोशी-भिसे, दीपाली बिजमवार-धुमशेटवार, शोभा शिराढोणकर-जाधव, यांचा समावेश आहे.

या महिलांच्या कार्यामधून महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रामध्ये सोनेरी इतिहासाचे पान लिहिले गेले आहे. त्यामुळे या सर्व कर्तृत्ववान महिलांना सॅल्युट करण्यासाठी आणि संदीप काळे यांच्या ‘वूमन पाॅवर’ तिच्या कर्तृत्वाची सक्सेस स्टोरी या मराठी, हिंदी, आणि इंग्रजी पुस्तक प्रकाशनच्या दैदिप्यमान सोहळ्यासाठी उपस्थित राहावे असे आवहान करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com