Mumbai News : एखादा भिकारी रस्त्यात किंवा रेल्वेत दिसला की पटकन आपण काही पैसे काढून त्याला देतो. विस्कटलेले केस, फाटलेले कपडे, भुकेला चेहरा अशी त्याची अवस्था पाहून आपल्याला दया येते. मात्र आपण ज्याची दया करतोय तो कोट्यधीश असेल तर. तुम्हालाही कदाचित धक्का बसेल, पण असाच एक कोट्यधीश भिकारी मुंबईत सापडला आहे. कदाचित तुम्ही याला एखादवेळी काही पैसे दिलेही असतील.
इकोनॉमिक्स टाईम्सच्या वृत्तानुसार, भीक मागून कोट्यवधींचा संपत्ती जमा केलेला भिकारी मुंबईत सापडला आहे.भरत जैन असं या जगातील सर्वात श्रीमंत भिकाऱ्याचं नाव आहेत .
भरत जैनला आर्थिक परिस्थितीमुळे चांगलं शिक्षण घेता आलं नाही. त्यामुळे चांगली नोकरी नसल्याने त्याने भीक मागण्याचा निर्णय घेता. भीक मागून जीवन जगणाऱ्या भरत जैनचं मुंबईत पत्नी, दोन मुले, भाऊ आणि वडील असं कुटुंबही आहेत. जैन याची संपत्तीचा आकडा ऐकाल तर तुमचे डोळे पांढरे होती. (Latest Marathi News)
जैनकडे जवळपास 7.5 कोटींची संपत्ती आहे. भीक मागून महिनाभरात जवळपास 60 ते 75 हजारांची कमाई तो करतो. आपल्या सारख्यांकडे भीक मागून भरत जैनने मुंबईत 1.2 कोटींचा 2BHK फ्लॅट खरेदी केलाय. या शिवाय त्याची ठाण्यात दोन दुकानंही आहेत. ज्यातून त्याला 30 हजार रुपये भाडेही मिळते. भरत जैन सीएसएमटी स्टेशन आणि आझाद मैदान या प्रमुख ठिकाणी भीक मागतात.
स्वत: भीक मागणाऱ्या भरत जैनने मुलांच्या शिक्षणाकडे बारीक लक्ष दिलं आहे. मुलांचं शिक्षण त्याने चांगल्या कॉन्व्हेंट शाळेत पूर्ण केलं आहे. त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य स्टेशनरीचे दुकान चालवतात. घरचे त्याला भीक मागणे बंद करण्याचा सल्ला देतात मात्र तरीरी त्याने आपलं काम सुरू ठेवलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.