Women ShivSainiks gathered outside Matoshri are aggressive
Women ShivSainiks gathered outside Matoshri are aggressiveSaam Tv

नवनीत राणांना महाप्रसाद देऊ; 'मातोश्री'बाहेर जमलेल्या महिला शिवसैनिक आक्रमक

Women Shivsainiks are Aggressive: मातोश्रीबाहेर जमलेल्या महिला शिवसैनिकांनी हातावर टॅटू काढले आहेत.
Published on

रश्मी पुराणिक

मुंबई: खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा शुक्रवारपासून मुंबईत आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री (Matoshri) या घरासमोर हनुमान चालीस पठण करण्यासाठी राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाले आहेत. राणा दाम्पत्याला मातोश्रीजवळ येण्यापासून रोखण्यासाठी शिवसैनिकांनी (Shivsainik) कालपासून मातोश्रीबाहेर कडा पहारा दिला आहे. आज (शनिवार) सकाळपासून पुन्हा शिवसैनिक मातोश्रीसमोर जमायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे यात महिला शिवसैनिकांचा मोठा सहभाग आहे. खासदार नवनीत राणांना (Navneet Rana) रोखण्यासाठी महिला शिवसैनिक या अतिशय आक्रमक झाल्या आहेत. (Women ShivSainiks gathered outside Matoshri are aggressive)

हे देखील पाहा -

मातोश्रीबाहेर जमलेल्या महिला शिवसैनिकांनी हातावर टॅटू काढले आहेत. यात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांंचे टॅटू काढण्यात आले आहे. राणा दाम्पत्यांबाबत या महिला शिवसैनिक अतिशय आक्रमक झाल्या आहेत. खासदार नवनीत राणा मातोश्रीजवळ आल्यास त्यांना महाप्रसाद देऊ असं या महिला शिवसैनिक म्हणाल्या. राणा दाम्पत्य आज (शनिवारी) सकाळी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसेचं पठण करण्यासाठी येणार आहेत. मात्र, त्यांना रोखण्यासाठी शिवसैनिक सज्ज आहेत. यात महिला शिवसैनिकांचाही मोठा सहभाग आहे.

Women ShivSainiks gathered outside Matoshri are aggressive
मोहित कंबोज यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर तेजस ठाकरेंकडून शिवसैनिकांची विचारपूस

दरम्यान शुक्रवारी रात्री भाजप नेते मोहित कंबोज यांच्या वाहनांचा ताफा हा मातोश्री परिसरातून जात असतानाच, कलानगर सिग्नलजवळ जमावानं अडवण्यात आला. त्यानंतर जमावानं कंबोज यांच्या कारवर हल्ला केला. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप होत आहे. मोहित कंबोज हे रेकी करत असल्याचा आरोप होत आहे. हल्ल्याच्या घटनेनंतर मोहित कंबोज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक लग्नाचा कार्यक्रम उरकून घरी जात होतो. कलानगरला सिग्नलजवळ माझी कार थांबली. त्यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कारवर हल्ला केला. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही, असं ते म्हणाले. रेकी करत असल्याच्या आरोपावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मी रेकी करत नव्हतो. मी एका लग्नसोहळ्यानंतर घरी जात होतो. त्याचवेळी माझ्या कारवर हल्ला केला, असं कंबोज यांनी सांगितलं.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com