Viral Video: सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल (Viral News) होत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही व्हिडीओ पाहून आपल्याला धक्का बसतो. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. काहीवेळा गोष्टी इतक्या मजेदार असतात की लोकांना पाहून प्रचंड आश्चर्य वाटतं तर कधी धक्का देखील बसतो. असाच एक व्हिडीओ आता समोर आला आहे. ज्यामध्ये धावत्या लोकलमध्ये महिलांची तुफान हाणामारी पाहायला मिळत आहे. (women fight in local train)
पनवेलच्या दिशेनं जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांची तुफान हाणामारी पाहायला मिळाली. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल (Viral Video) होत आहे. दरम्यान, लोकलमध्ये महिला कॉन्सेबलनं मध्यस्थी केली आणि बघता बघता प्रकरण आणखी चिघळले. या हाणामारीत महिला कॉन्सेबल देखील जखमी झाल्या आहेत.
सीटवर बसण्यावरुन हा वाद झाला आल्याचे बोलले जात आहे. मात्र या घटनेमुळे लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लोक हा व्हिडीओ शेअर करत आहेत.
काय आहे नेमक प्रकरण?
बुधवारी संध्याकाळी पावणे आठच्या दरम्यान ठाणे ते पनवेल या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये तुंबळ हाणामारी झाली. लोकलमधील बसायच्या जागेवरून तीन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. ठाण्यावरून बसलेल्या मायलेकी आणि नात या पनवेलचे दिशेने जात असताना कोपरखैरणे येथे एक महिला चढली, तुर्भेत जागा झाली यामुळे ती बसली असता, छोट्या मुलीला बसू दिलं नाही यावरून शाब्दिक बाचाबाची झाली आणि याचा रूपांतर मारामारीत झालं.
या लोकलमध्ये नेरूळ वरून महिला पोलीस कर्मचारी भांडण सोडवण्यासाठी चढल्या असतात त्यांना देखील या मारहाणीत दुखापत झाली आहे. यासंदर्भात माय लेकी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.