संदीप काळे यांच्या ‘वूमन पॉवर’ पुस्तकांचे प्रकाशन, स्त्री सन्मानाकडे दुर्लक्ष नको : पोपटराव पवार

‘महाराष्ट्राची सावित्री पुरस्कार’ देऊन कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
Sandip kale with popatrao pawar, dr neelam gorhe at woman power book launch
Sandip kale with popatrao pawar, dr neelam gorhe at woman power book launchSaam Tv
Published On

पुणे : "कुटुंब सक्षम राहण्यासाठी आरोग्यदायी स्वयंपाक घर असणे आवश्यक आहे. त्यासाठी जीवनशैली बदलण्याची गरज असून मुलांच्या सकस आहाराकडे लक्ष दिली पाहिजे. स्त्री सन्मानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अशा शब्दांत भावना व्यक्त करत आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार (Popatrao Pawar) यांनी महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले.

Sandip kale with popatrao pawar, dr neelam gorhe at woman power book launch
गोविंद पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता ?' पुस्तकावरून नवा वाद; मेधा पानसरे म्हणाल्या...

संपादक, लेखक, संघटक, निवेदक असणाऱ्या (sandip Kale) संदीप काळे यांच्या ‘वूमन पॉवर - तिच्या कर्तृत्वाची सक्सेस स्टोरी’ या मराठी, हिंदी, आणि इंग्रजी अशा तीन पुस्तकांचे प्रकाशन पार पडला. ज्या महिलांवर हे पुस्तक आहे त्यांना ‘महाराष्ट्राची सावित्री पुरस्कार’ देऊन कर्तृत्ववान महिलांचा सन्मान झाला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) यांच्या हस्ते प्रकाशन आणि पुरस्कार पार पडला. यावेळी अभिनेते अजय पूरकर, लेखक व पत्रकार सुरेखा पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पोपटराव पवार अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमात पोपटराव पवार म्हणाले, ‘‘महिला सक्षम असेल, तर ते कुटुंब आनंदी आणि आरोग्यदायी राहते. त्यामुळेच एखाद्या सक्षम कुटुंबासाठी महिला सक्षम असणे आवश्यक आहे. ‘तिचा’ सन्मान झाला पाहिजे.

‘‘‘स्त्री’चा प्रवास हा तिच्या एकटीचा कधीच नसतो, तर तो समूहाच्या सहभागाचा असतो. यशाच्या मार्गावर जात असताना स्पर्धात्मक, द्वेष, मत्सर या भावनांना एखाद्या यशस्वी पुरुषांनासुद्धा सामोरे जावे लागलेले असते. परंतु स्त्री एखादी गोष्ट साध्य करते, त्यावेळी दुदैवाने अनेक स्त्रियांनासुद्धा ‘तिचे’ यश स्वीकारता, सांभाळता किंवा मनापासून त्याचा आनंद घेताना दिसून येत नाही. अशाप्रकारे अडथळे येऊन सुद्धा हसतमुखाने सगळ्या जगाला सामोरे जाण्यासाठी महिला पुढे जात आहेत. समाजाचे प्रागतिक स्वरूपाचे चित्र तुमच्या सगळ्यांच्या कामातून, प्रवासातून दिसते.’’ असे मत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

Sandip kale with popatrao pawar, dr neelam gorhe at woman power book launch
गोविंद पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता ?' पुस्तकावरून नवा वाद; मेधा पानसरे म्हणाल्या...

अभिनेते सिनेअभिनेते अजय पूरकर यावेळी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवसंस्कार घराघरांत पोचविण्यासाठी आम्ही ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती करत आहोत. या चित्रपटांच्या माध्यमातून शिवसंस्कार महाराष्ट्रात आणि देशात जात आहेत.’’

लेखक व पत्रकार असणाऱ्या सुरेखा पवार म्हणाल्या, संदीपच्या लेखणीत सकारात्मक गोष्टींना आवर्जून स्थान दिले जाते. आत्मभानातून समाजातील प्रश्नांबाबत जाणीवा महिलांमध्ये जागृत आहेत. या जाणिवेतूनच समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी महिला पुढे येत आहेत. अशाच कर्तृत्ववान महिलांच्या सामाजिक कामातील योगदानाचा दस्तऐवज वूमन पॉवर’ या पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित झाला आहे..’’ राजश्री महल्ले पाटील यांनी सर्व पुरस्कार प्राप्त महिलांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, हा पुरस्कार काम करण्यासाठी उर्जा देणारा असेल.

‘वूमन पॉवर’ या पुस्तकाचे लेखक संदीप काळे यांनी पुस्तक लेखनामागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘वूमन पॉवर’ हे पुस्तकही वाचकांच्या मनात घर करेल. महाराष्ट्राच्या प्रत्येक स्त्रीयांनी हे पुस्तक वाचून त्याप्रमाणे आदर्श घेत वेगळं काहीतरी काम करून दाखवायचं हे धाडस हे पुस्तक वाचल्या शिवाय कळणार नाही. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण करंदीकर यांनी केले. पुण्याच्या मेरीगोल्ड हॉटेलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक दिग्गज मान्यवरांनी आपली हजेरी लावली होती.

‘या महिलांचा झाला महाराष्ट्राची सावित्री पुरस्कार’ सन्मान.

विजयमाला गिरी-पुरी, टिना शहा-धरमसी, डॉ.माधवी ठाकरे, राजश्री महल्ल्ले-पाटील, डॉ. रेखा शेळके-धावडे, रेवती पार्डीकर-गव्हाणे, दुर्गा गुडिलू, लत्ता उमाळे-तायडे, मीरा ढास, डॉ. रागिणी पारेख, रिता पाटील-माहोरे, मुक्ता काटकर-भोसले, रेणुका कड, डॉ. सविता गिरे -पाटील, सारिका पन्हाळकर-महोत्रा, डॉ. रजनी होनमुटे-भाजीभाकरे, डॉ. कांचन पाटील-वडगावकर, प्रांजली ऊर्फ मयूरी मद्रेवार-बोरलेपवार, शिल्पा फलफले शेटे, शर्मिष्ठा जाधव, झरीन गुप्ता, स्वप्ना कुलकर्णी-राठोड, लीलावती ऊर्फ लीला चौहान-शिंदे, श्रेया भिडे-भारतीय, सुनीता भाबड-नागरे, स्वप्ना ठाकूर-पाटील, अश्विनी ऊर्फ गौरी डावकर-मोरे, प्रिया मनाठकर-बंडेवार, विजयालक्ष्मी शिवनगावकर-रामोड, डॉ. पल्लवी रामनाथ दिघुळे-मुंडे, शिल्पा चेऊलवार-गंजेवार, शीतल तेजवाणी-सूर्यवंशी, इंदूबाई पानसरे-गावडे, स्वाती जोशी-भिसे, दीपाली बिजमवार-धुमशेटवार, शोभा शिराढोणकर जाधव.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com