गोविंद पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता ?' पुस्तकावरून नवा वाद; मेधा पानसरे म्हणाल्या...

दादोजी कोंडदेव यांच्या वर्णनात बदल करण्यात आला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. या पुस्तकावरून सुरु झालेल्या वादावर गोविंद पानसरे यांच्या सून मेधा पानसरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Govind Pansare Book controversy
Govind Pansare Book controversySaam tv

मुंबई : दिवंगत गोविंद पानसरे (Govind Pansare) यांच्या 'शिवाजी कोण होता ?' या पुस्तकावरून नवा वाद समोर आला आहे. पानसरे यांच्या हत्येनंतर त्यांच्या पुस्तकातील मजकूर बदलण्याचा आरोप करण्यात येत आहे. सावकरवादी मधूसुदन चेरेकर यांनी फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली आहे. २०१५ आणि २०१९ च्या आवृत्तीमध्ये दादोजी कोंडदेव यांच्या वर्णनात बदल करण्यात आला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. या पुस्तकावरून सुरु झालेल्या वादावर गोविंद पानसरे यांच्या सून मेधा पानसरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Govind Pansare Book controversy News)

Govind Pansare Book controversy
'मला खूप वेळा राजकारण सोडावंसं वाटतं; गडकरींच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका कार्यक्रमात 'दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते. रामदास स्वामी यांचा शिवाजी महाराजांशी संबंध काय' अशा आशयाची विधाने केली होती. त्यांच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर गोविंद पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता ?' पुस्तकाच्या ताज्या आवृत्तीत दादोजी कोंडदेव यांचे वर्णन बदलण्यात आलं आहे असा आरोप करण्यात येत आहे. त्यानंतर या पुस्तकावरून नवा वाद समोर आला आहे. पानसरे यांच्या हत्येनंतर त्यांच्या पुस्तकातील मजकूर बदलण्याचा आरोप करण्यात येत आहे. २०१५ च्या आवृत्तीत 'दादोजी कोंडदेव हे तर त्यांचे गुरूच होते' असा उल्लेख आहे. तर २०१९ च्या आवृत्तीत 'दादोजी कोंडदेव हे पुण्याच्या जहागिरीचे कारभारी होते' असा उल्लेख आहे. या वादानंतर मेधा पानसरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Govind Pansare Book controversy
आमदार रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर अजित पवारांनी स्पष्टच सांगितले

मेधा पानसरे म्हणाल्या,' मी आताच या वादाबद्दल ऐकलं. २०१० मध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा अमृत महोत्सव झाला. त्यावेळी अमृत महोत्सव समिती स्थापन झाली. त्याची मी एक सदस्य होती. या अमृत महोत्सव समितीने यावेळी जेष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंहराव पवार यांना विनंती केली होती की, कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं समग्र साहित्य त्यांनी संपादित करावं. समितीच्या विनंतीनंतर जयसिंहराव पवार यांनी संपूर्ण पुस्तक संपादित केलं.

यावेळी त्यांची गोविंद पानसरे यांच्याशी चर्चा झाली. ही चर्चा करताना पानसरे यांना जी माहिती मिळाली, त्याप्रमाणे पानसरे यांनी ती पुस्तिका लिहिली होती. मधल्या काळात जी नवीन माहिती आणि संशोधन झालं. त्याच्या निष्कर्षावरून जयसिंहराव पवार यांनी चर्चा ही पानसरे यांच्यासोबत केली. त्या चर्चेनंतर त्यांनी पानसरे यांच्या परस्पर संमतीने पुस्तकात बदल केले. हे बदल २०१० मध्ये करण्यात आले आहे. मात्र, अनेकांकडून जुन्या आवृत्या प्रसिद्ध करून विकल्या जातात. २०१० मधील आवृत्ती पानसरे यांच्या हयातीत झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com