Wolfdog : पुण्यात आढळला कुत्रा आणि लांडग्याचा नवा संकर; वुल्फडॉगमुळे लांडग्यांची प्रजात धोक्यात

wolfdog breed in pune : मानवाच्या पर्यावरणातील हस्तक्षेपामुळे जैव विविधतेत मोठे बदल व्हायला सुरुवात झालीय. त्याचाच परिणाम आता पुण्यात पहायला मिळालाय. पुण्यात लांडग्याची नवी प्रजात आढळून आलीय.
पुण्यात आढळला कुत्रा आणि  लांडग्याचा नवा संकर; वुल्फडॉगमुळे लांडग्यांची प्रजात धोक्यात
Wolfdog Saam tv
Published On

भरत मोहळकर, साम टीव्ही

पुणे : गेल्या काही वर्षात पर्यावरणातील मानवाचा हस्तक्षेप वाढला आहे. त्याचा थेट परिणाम पुण्यात दिसून आला आहे. पुण्यात नवा लांडगा आढळून आला आहे. लांडगा आणि भटक्या कुत्र्यांच्या संकरातून वूल्फडॉग ही नवी प्रजाती तयार आली आहे.. त्यामुळे लांडग्यांची प्रजातीच धोक्यात आलीय.

पश्चिम महाराष्ट्रातील गवताळ मैदानी भागात वूल्फडॉग आढळले. जंगली लांडगे आणि भटक्या श्वानांच्या संकरणातून वूल्फडॉग प्रजाती अस्तित्वात आली. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातही वूल्फ डॉग प्रजातीचा वावर आहे. पुणे शहरातील 'द ग्रास लँड एनजीओ'ने वूल्फ डॉग प्रजातीचा शोध लावला. वूल्फ डॉग प्रजाती अस्तित्वात आल्याची एनसीबीएस आणि ATREEने मान्य केलं.

पुण्यात आढळला कुत्रा आणि  लांडग्याचा नवा संकर; वुल्फडॉगमुळे लांडग्यांची प्रजात धोक्यात
Pune Hit and Run Case : पुणे हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट; राज्य सरकार कायदेशीर कारवाई करण्यासाठी मोठं पाऊल उचलणार

पुण्यातील पुरंदर परिसरात 2014 मध्ये द ग्रास लँड ट्रस्ट या एनजीओच्या संशोधकांना लांडग्यांच्या कळपात वेगळ्याच प्रकारचा प्राणी आढळून आला आहे. तो प्राणी लांडग्यांच्या कळपात असतो. तरी तो कोणता प्राणी आहे? यावर संशोधन केलं. त्यानंतर संशोधकांच्या हाती धक्कादायक माहिती लागली आहे. तर हा भटका कुत्रा आणि लांडग्यांच्या संकरातून तयार झालेला प्राणी आहे. या प्राण्याचा माणसाला धोका नाही. मात्र या नव्या लांडग्यामुळे लांडग्यांची ओरिजिनल प्रजातीच धोक्यात असल्याचं द ग्रासलँड ट्रस्ट सोसायटीचे संशोधक सिद्धेश ब्राह्मणकर यांनी सांगितलं आहे.

पुण्यात आढळला कुत्रा आणि  लांडग्याचा नवा संकर; वुल्फडॉगमुळे लांडग्यांची प्रजात धोक्यात
VIDEO : पुणे हादरले! ३ तरुणांसह महिलेचं अपहरण करून बेदम मारहाण, व्हिडिओ बघून प्रचंड चीड येईल

वुल्फडॉगचा माणसाला धोका नसला तरी लांडग्यांच्या जीन्समध्ये बदल होतोय. त्यामुळे लांडग्याची प्रजातच धोक्यात आहे. जर लांडग्याची प्रजात धोक्यात आली तर त्याचा परिणाम इतर जैव साखळीवर होणार असल्याने हा पर्यावरणासाठी मोठा धोका असल्याचं म्हटलं जातं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com