Rajya Sabha Election Results : महाष्ट्रातून राज्यसभेवर गेलेल्या सहा महारथींबद्दल थोडक्यात

Rajya Sabha Election Maharashtra Results : शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी, भाजपचे पीयूष गोयल आणि अनिल बोंडे हे विजयी झाले.
Winning Candidates In Rajya Sabha Election 2022 Maharashtra
Winning Candidates In Rajya Sabha Election 2022 MaharashtraSaam Tv
Published on

मुंबई: राज्यसभेच्या ६ जागांसाठीचं मतदान काल (शुक्रवारी) पार पडलं. भाजपने यात तिसरा उमेदवार दिल्याने राज्यसभेच्या (Rajya Sabha Election 2022) ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात होते त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली. या निवडणुकीचा (Election 2022) निकाल शनिवारी मध्यरात्री लागला. यात भाजपने दिलेला तिसरा उमेदवार निवडून आला असून शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी, भाजपचे पीयूष गोयल आणि अनिल बोंडे हे विजयी झाले. तर धनंजय महाडीक हे विजयी झाल्याने भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी ठरल्याचे मानले जाते. याच पार्श्वभूमीवर या सहाही विजय उमेदवारांबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात... (Winning Candidates In Rajya Sabha Election 2022 Maharashtra Sanjay Raut Prafull Patel Dhananjay Mahadik Imran Pratapgadi Anil Bonde Piyush Goyal)

संजय राऊत
संजय राऊतSaam Tv

संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे यांनी राज्यसभा निवडणूकीत विजय मिळवला. ते शिवसेनेतले महत्तवाचे नेते आणि उद्धव ठाकरेंच्या जवळचे नेते आहेत. ते राजकारणी आणि पत्रकार आहेत. सोबतच सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. संजय राऊत तीनवेळा खासदार म्हणून निवडून आले होते. आता पुन्हा त्यांनी विजय मिळवला आहे. शिवसेनेची भूमिका ठरवताना संजय राऊतांचा मोठा सहभाग असतो. संजय राऊत यांना ४१ मते मिळाली आहेत.

प्रफुल्ल पटेल
प्रफुल्ल पटेलSaam Tv

प्रफुल्ल पटेल

राज्यसभेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल विजयी झाले आहेत. प्रफुल्ल मनोहरभाई पटेल हे एक उत्तम राजकारणी व माजी केंद्रीय मंत्री आहेत. राष्ट्रवादीकडून आजवर ते ४ वेळा लोकसभेवर निवडून आले तर पटेल राज्यसभा सदस्य देखील राहिले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांनी अनेक पदे भुषवली आहेत. २०१२ पासून ते अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष आहेत. ते शरद पवारांच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक आहेत. राज्यसभेत ते पक्षाची भूमिका ताकदीने मांडतात. प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची ४३ मते मिळाली.

अनिल बोंडे
अनिल बोंडेSaam Tv

अनिल बोंडे

भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी राज्यसभा निवडणूकीत यश मिळवले असून भाजपला विजय मिळवून दिलाय. भाजपच्या तीन उमेदवारांपैकी असलेले अनिल बोंडे यांनी राज्यसभेची निवडणूक जिंकून खारदारकीवर शिक्कामोर्तब केलाय. भाजपचे उमेदवार अनिल बोंडे यांना पहिल्या पसंतीची ४८ मते मिळाली आहेत.

पियुष गोयल
पियुष गोयलSaam Tv

पियुष गोयल

पियुष गोयल यांनी राज्यसभा निवडणूकीत विजय मिळवत भाजपच्या पदरात खासदारकी मिळवून दिली आहेत. पियुष गोयल सध्या रेल्वेमंत्री आहेत. भाजपने पियुष गोयलसह आणखी अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांना निवडणूकीसाठी उमेदवारी दिली होती. भाजपचे उमेदवार पीयूष गोयल यांना पहिल्या पसंतीची ४८ मते मिळाली आहेत.

धनंजय महाडिक
धनंजय महाडिकSaam Tv

धनंजय महाडिक

राज्यसभेच्या निवडणूकीत संजय पवार यांच्याविरोधात भाजप नेते धनंजय महाडिक अशी लढाई होती. यात धनंजय महाडिक यांनी विजय मिळवत खासदारकीवर शिक्कामोर्तब केलाय. धनजय महाडिक हे या आधी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये होते. २०१९ची लोकसभेची निवडणूक हरल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. धनंजय महाडिक यांना ४१ मतं मिळाली.

इम्रान प्रतापगढी
इम्रान प्रतापगढीSaam TV

इम्रान प्रतापगढी

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसने इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिली होती. या निवडणूकीत त्यांनी विजय मिळवत क़ाँग्रेसच्या पदरात खासदारकी मिळवून दिली. पहिल्यांदा काँग्रेसनी जाहीर केलेल्या या एकमेव उमेदवारावरुनही पक्षात दुफळी माजली होती. यावेळी काही काँग्रेस नेत्यांनी प्रतापगढी यांच्या उमेदवारीवरुन नाराजी दाखवली होती. इम्रान प्रतापगढी यांना ४४ मतं मिळाली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com