सिल्व्हर ओक हल्ला प्रकरण: संदीप गोडबोलेच्या ओळखीतला 'तो' आमदार कोण?

Silver Oak Attack News: संदीप गोडबोले कोणत्या आमदार निवासात थांबला होता? त्याला कोणत्या आमदाराने मदत केली होती हा सगळा पोलिस तपासाचा भाग आहे असं वकिल प्रदीप घरत म्हणाले.
Who is the MLA known to Sandeep Godbole in silver oak attack case
Who is the MLA known to Sandeep Godbole in silver oak attack caseSaam TV
Published On

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर ७ एप्रिलला एसटी कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन केलं होतं. या हल्ल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. याप्रकरणी पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतलं आहे. यात संदीप गोडबोले (Sandip Godbole) या एसटी कर्मचाऱ्याला (ST Worker) पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर येत आहे. पवारांच्या (Sharad Pawar) घरावरील हल्ल्याबाबत गोडबोले या सगळ्या कटात सूत्रधार म्हणून काम पाहत होता. त्याला आज कोर्टाने 16 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे. या सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे गोडबोले आमदार निवासात (MLA House) थांबला होता. त्याने कोर्टासमोर स्वतः हे मान्य केलंय. त्यामुळे कोणत्या आमदाराच्या ओळखीवरून तो आमदार निवासात थांबला याबाबत तपास केला जाणार आहे अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे. (Who is the MLA known to Sandeep Godbole in silver oak attack case)

हे देखील पहा -

याबाबत पोलिसांच्या हाती संदीप गोडबेले याने केलेलं संभाषण लागलं आहे. प्रदीप घरत (Pradip Gharat) यांनी पुढे सांगितलं की, संदीप गोडबोले याला १६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. आरोपीला न्यायालासमोर हजर केले असता आरोपीने स्वतःची बाजू स्वतः मांडली आणि त्याने ही गोष्ट कबूल केली की, आरोपी क्र. १ गुणरत्न सदावर्ते (Gunaratan Sadavarte) यांच्या घराच्या टेरेसवर ७ तारखेला मिटींग ठेवली होती. यात आरोपीच्या म्हणण्यानुसार तो स्वतः या मिटींगला हजर नव्हता. वकिलांच्या म्हणण्यानुसार सदर आरोपीनेच मोर्चाचं सुत्रसंचालन केलं. कारण त्याच्याकडून व्हाईस कॉल रेकार्डिंग पोलिसांच्या हाती लागलं आहे. त्यात माणसं कुठे तयार ठेवायची, कशी तयार ठेवायची, त्यांना कसं आणायचं, कुठे आणायचं आणि सिल्व्हर ओक बंगल्यावर कसं जायचं हे सगळं पोलिसांच्या हाती लागलं आहे.

Who is the MLA known to Sandeep Godbole in silver oak attack case
फडणवीसांचे शरद पवारांबद्दल सलग १४ ट्विट; 'या' घटनांचा दिला संदर्भ (पाहा Video)

आरोपीच्या म्हणण्यानुसार आरोपी क्रं. १ (सदावर्ते) आम्हाला सुचना देत होता. मी फक्त आंदोलनस्थळी हजर होतो आणि माझ्याकडे अभिषेक पाटील आला की नाही याची चौकशी केली. तसेच अभिषेक पाटील आला की त्याला मला संपर्क करायला सांगा एवढंच आमचं संभाषण झालं अशी संदीप गोडबोले याने कोर्टासमोर कबूली दिली. हा आरोपी कुठल्या पक्षाचा, संघटनेचा आहे का याबाबत तपास केला जात आहे. संदीप गोडबोले कोणत्या आमदार निवासात थांबला होता? त्याला कोणत्या आमदाराने मदत केली होती हा सगळा पोलिस तपासाचा भाग आहे असं प्रदीप घरत म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com