फडणवीसांचे शरद पवारांबद्दल सलग १४ ट्विट; 'या' घटनांचा दिला संदर्भ (पाहा Video)

मुस्लीमांच्या अनुनयाच्या राजकारणावरून शरद पवार यांच्या मागील काळातील काही भूमिकांचे स्मरण करून देत त्यांनी पवारांवर निशाना साधला आहे.
Sharad Pawar / Devendra Fadnavis
Sharad Pawar / Devendra FadnavisSaam TV
Published On

सुशांत सावंत -

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जयंतीचे निमित्त साधत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधात सलग १४ ट्विटस करत त्यांनी सतत मुस्लीमांचा अनुनय केल्याचा आरोप केला आहे. फडणवीसांनी एकापाठोपाठ एक असी सलग १४ ट्विट करत Articl ३७० पासून इशरत जहाँ प्रकरणातील वेगवेगळ्या घटनांचा संदर्भ दिला आहे शिवाय शरद पवार यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकरणात केलेल्या वक्तव्याची लिंक देखील त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिल्या आहेत

मुस्लीमांच्या अनुनयाच्या राजकारणावरून शरद पवार यांच्या मागील काळातील काही भूमिकांचे स्मरण करून देत त्यांनी पवारांवर निशाना साधला आहे. या ट्विटमध्ये फडणवीसांनी (Devendra Fadnavis) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कलम 370 ला कडाडून विरोध होता, याचे स्मरण करून देताना राष्ट्रवादीने याबाबत घेतलेल्या भूमिकेवर केले प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

तसंच 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) या चित्रपटावरून अलिकडेच शरद पवार यांनी केलेल्या विधानांचाही त्यांनी या ट्विटद्वारे घेतला समाचार घेतला आहे. तर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना मनी लाँडरिंग प्रकरणात अटक होताच, ते मुस्लिम आहेत, म्हणून त्यांचा संबंध दाऊदशी जोडला जातोय असं पवारांनी केलेल्या विधानाचा उल्लेखही या फडणवीसांनी या ट्विटमध्ये केला आहे.

इशरत जहाँ ही (Ishrat Jahan) कशी निर्दोष होती, याबाबत पवारांनी केलेल्या विधानाचेही स्मरण केले आहे. एवढेच नाही तर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी इशरतच्या मदतीसाठी केलेल्या प्रयत्नांचाही उल्लेख त्यांनी पुराव्यानिशी या ट्विटमघ्ये केला आहे.

2012 मध्ये आझाद मैदानात (Azad Maidan) हिंसाचारानंतर कशी ढिलाई दाखविली आणि रझा अकादमीवर कारवाई केली नाही. संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षणाला विरोध असताना मुस्लिम आरक्षणासाठी सातत्याने पुढाकार का घेतला? अल्पसंख्यक समाज कोणाचाही पराभव करू शकतो, याही विधानाचे स्मरण करून दिले आहे. 'हिंदू दहशतवाद' हा शब्दप्रयोग सर्वप्रथम कुणी केला, असे विचारत त्यांनी पवारांवर निशाना साधला. मुंबई बॉम्बस्फोटानंतर 13 वा बॉम्बस्फोट हा मुस्लिम वस्तीत झाल्याचे खोटे सांगितल्यावर सुद्धा प्रश्न उपस्थित केले आहे.

दरम्यान, काश्मीर फाईल्समध्ये काश्मिरी पंडितांच्या वेदनांचे चित्रण असताना असा दुटप्पीपणा का? तुमच्या छद्मी धर्मनिरपेक्षतेच्या अजेंड्याला धक्का बसेल म्हणून? का असा प्रश्नही त्यांनी आपल्या चौदा ट्विटमध्ये केली आहे. तर काश्मीर फाईल्स हा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. मग केवळ अनुनयाच्या हेतूने जातीय विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतात हे स्वीकारार्ह नाही! असा शेवट करत त्यांनी पवारांच्या मागील भूमिकांची आठवण करुन दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com