कोण आहेत निल सोमय्या? नील यांच्यावर खंडणीचा आरोप

निल सोमय्या यांचं एक प्रकरण दोन वर्षे जुनं आहे. निल सोमय्या यांनी एका खासगी विकासकाला धमकावून खंडणी मगितल्याचा आरोप आहे.
Neil Somaiya
Neil SomaiyaSaam Tv
Published On

मुंबई - निल किरीट सोमय्या (Neil Somaiya) हे मुलुंड मधील भाजपचे नगरसेवक आहेत. ही नगरसेवक पदाची त्यांची पहिलीच टर्म आहे. ते २०१७ मुलुंडमधून निवडून (Election) आले. निल सोमय्या हे भाजप (BJP) प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचे चिरंजीव आहेत. (Latest Political News In Marathi)

किरीट सोमय्या महाविकास आघाडी सत्तेत आल्या नंतर सातत्याने महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नेते आणि ठाकरे परिवारावर आरोपांच्या फैरी झडत आहेत . त्यांच्याकडून सातत्याने ठाकरे सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत.

हे देखील पहा -

निल सोमय्या यांची पोलिसांनी केलीय चौकाशी ?

निल सोमय्या यांचं एक प्रकरण दोन वर्षे जुनं आहे. निल सोमय्या यांनी एका खासगी विकासकाला धमकावून खंडणी मगितल्याचा आरोप आहे. २०२१ जानेवारी मध्ये निल सोमय्या यांना या प्रकरणी समन्स बजावन्यताला होता, तेव्हा मुलुंड पोलीस ठाण्यात त्यांची ४ तास कसून चौकशी करण्यात आली , आणि त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला होता .

Neil Somaiya
अभिनेते सयाजी शिंदे यांनी साजरा केला अनोख्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे...

प्रकरण काय ? एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीने २०२० साली जानेवारी महिन्यात आपल्या दोन टॉवर्सशी निगडीत काम एका खाजगी ठेकेदाराला दिलं होतं . पण नील सोमय्या यांच्याशी संबंधित असलेल्या काही लोकांनी ठेकेदाराला थेट नील सोमय्या यांच्या कार्यालयात बोलावून एका टॉवरचं काम त्याच्याकडून काढून घेतलं . पण काही दिवसांनी पुन्हा निल सोमय्या यांच्या लोकांनी ठेकेदाराला निल यांच्या कार्यालयात बोलावलं आणि निल यांच्या उपस्थितीतच त्या ठेकेदाराला धमकी दिली. तसेच त्याच्याकडून दुसऱ्या टॉवरचं कामही दे किंवा त्याबदल्यात आम्हाला फ्रॉफिट दे असं सांगितलं. याच प्रकरणी गुन्हा दाखल होऊन वर्षभराने निल यांची चौकशी होऊन जबाब नोंदवण्यात आला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com