...तर शरद पवारांपेक्षा उद्धव ठाकरे 'बेस्ट' पंतप्रधान होतील; शिवसेना खासदारानं स्पष्टच सांगितलं

शरद पवारांपेक्षा उद्धव ठाकरे 'बेस्ट' पंतप्रधान होतील, असं उत्तर शिवसेना खासदारानं 'Sarkarnama Open Mic Challenge' या कार्यक्रमात दिलं.
Sharad Pawar and Uddhav Thackeray Maharashtra Politics, Maharashtra Political News in Marathi, Sarkarnama Open Mic Challenge
Sharad Pawar and Uddhav Thackeray Maharashtra Politics, Maharashtra Political News in Marathi, Sarkarnama Open Mic ChallengeSAAM TV
Published On

पुणे: आपल्याला पंतप्रधान व्हायचं आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार कधीच जाहीरपणे बोलले नसले तरी, जेव्हा-जेव्हा देशात महाआघाडीची चर्चा होते, तेव्हा शरद पवार आणि पंतप्रधानपद ही चर्चा देशातील राजकीय वर्तुळात सुरू होते. आता हाच विषय पुन्हा चर्चेत आला आहे. निमित्त होतं 'सकाळ डिजिटल'तर्फे आयोजित 'Sarkarnama Open Mic Challenge' या कार्यक्रमाचं. केंद्रात जेव्हा तुमचं सरकार येईल तेव्हा चांगले पंतप्रधान म्हणून शरद पवार असू शकतात की, उद्धव ठाकरे?, असा 'गुगली' खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांना टाकला. मात्र, जलील यांनी टाकलेला हा गुगली चेंडू राजकारणाच्या पीचवर कमी अनुभव असलेला शिवसेनेचा तरूण फळीतील नेता श्रीकांत शिंदे यांनी तितक्याच खुबीनं टोलवला. (Maharashtra Political News in Marathi)

Sharad Pawar and Uddhav Thackeray Maharashtra Politics, Maharashtra Political News in Marathi, Sarkarnama Open Mic Challenge
'रस्ता बदला, आपण चुकीच्या दिशेने आहोत'; वसंत मोरेंचा WhatsApp स्टेटस व्हायरल

सकाळ डिजिटलतर्फे 'Sarkarnama Open Mic Challenge' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. राजकीय कार्यक्रमातील हा हटके असा प्रयोग आहे. यात खासदार श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांनी राज्यातील सत्ताधारी पक्षातील मित्र काँग्रेस नेते धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh), राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्यमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) तसेच खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel), भाजपचे आमदार परिणय फुके (Parinay Fuke) यांनी विचारलेल्या प्रश्नांचा 'शिवसेना स्टाइल'नं उत्तरं देत सामना केला.

केंद्रात तुमचं सरकार आलं तर, शरद पवार हे चांगले पंतप्रधान होऊ शकतात की उद्धव ठाकरे? असा प्रश्न खासदार इम्तियाज जलील यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना विचारला. जलील यांनी विचारलेला हा प्रश्न 'गुगली'च होता. मात्र, राजकारणाच्या पीचवर कमी अनुभव असला तरी, दोन टर्म संसदेत शिवसेनेचे प्रतिनिधीत्व करणारे तरूण खासदार श्रीकांत शिंदे यांनी तो उत्कृष्टरित्या टोलवला. जेव्हा केंद्रात आमचं सरकार येईल तेव्हा नक्कीच उद्धव ठाकरे हेच चांगले पंतप्रधान असू शकतात, असं उत्तर शिंदे यांनी दिलं. जलील यांच्या 'गुगली' प्रश्नानंतर, भाजप आमदार फुके यांनीही लगेच यॉर्कर टाकला. पण जलील यांच्या प्रश्नावर उत्तर दिल्यानंतर 'कॉन्फिडन्स' वाढलेल्या श्रीकांत शिंदे यांनी फुके यांनी टाकलेला 'यॉर्कर'ही उत्कृष्टरित्या खेळून काढला. महाविकास आघाडी सरकारमध्ये कुणाच्या कामावर समाधानी आहात? मुख्यमंत्री की नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे? असा प्रश्न विचारला. त्यावर या राज्याचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. ते मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे काम करत आहेत. मुख्यमंत्री राज्याचा गाडा चांगल्या प्रकारे हाकतात. त्यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे हे चांगल्या प्रकारे काम करत आहेत, असं उत्तर श्रीकांत शिंदे यांनी दिलं.

Sharad Pawar and Uddhav Thackeray Maharashtra Politics, Maharashtra Political News in Marathi, Sarkarnama Open Mic Challenge
किरीट सोमय्या उद्या राणा दाम्पत्याची भेटून माफी मागणार, कारण...

खासदार म्हणून श्रीकांत शिंदेंची दुसरी टर्म आहे. संसदेच्या कामकाजात सहभागी होताना, कोणता फरक जाणवतो, असा प्रश्न आदिती तटकरे यांनी विचारला. त्यावर २०१४ मध्ये माझ्यासाठी सगळं नवीन होतं. सुरुवातीचा काळ हा समजून घेण्यात आणि शिकण्यात गेला. त्यावेळी चांगले वक्तृत्व असलेले नेते निवडून आले होते. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे होते. २०१९मध्ये बरेच नवीन सदस्य होते. त्यांच्याकडूनही काही वेगळा अनुभव घेता आला, असं शिंदे यांनी सांगितलं.

आवडत्या अभिनेत्रीचं नाव विचारताच शिंदे म्हणाले...

या कार्यक्रमात राज्यातील सत्ताधारी पक्ष असेलल्या काँग्रेसचे नेते धीरज देशमुख यांनी श्रीकांत शिंदेंना विचारलेल्या प्रश्नानंतर उपस्थितांमध्ये एकच हश्या पिकला. तुमची आवडती अभिनेत्री कोण? असा प्रश्न देशमुख यांनी शिंदेंना विचारला. त्यावर आवडणाऱ्या अभिनेत्री खूप आहेत, असं उत्तर शिंदे यांनी दिलं.

व्हिडिओ पाहा:

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com