Nana Patole : 'नानांचा इतिहास वादग्रस्त नेते म्हणून'; आम्ही कोर्टात जाणार - चंद्रकांत पाटील

'भाजपचे नेते राज्यभर आंदोलन करत आहेत मात्र आमच्या तक्रारी देखील पोलिस ऐकून घेत नाहीत. गावोगावी पोलिस प्रशासन आम्हांला हैरान करत आहे, आम्ही नानांच्या विरोधात कोर्टात जाणार आहोत असून त्यांची तक्रार राज्यपालांकडे देखील तक्रार करणार'
Nana Patole : 'नानांचा इतिहास वादग्रस्त नेते म्हणून'; आम्ही कोर्टात जाणार - चंद्रकांत पाटील
Nana Patole : 'नानांचा इतिहास वादग्रस्त नेते म्हणून'; आम्ही कोर्टात जाणार - चंद्रकांत पाटीलSaam TV
Published On

मुंबई : नाना पटोले यांचा इतिहास वाद निर्माण करणारे नेते म्हणून आहे. त्यांच्या नेत्यांकडून त्यांनी गुण घेतले आहेत, नेत्यांच्या आई मात्र शांत असतात असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राहूल गांधी यांच नावं न घेता लगावला आहे.

दरम्यान नाना पटोले यांच्या दोन वादग्रस्त वक्तव्याचा दाखलाही यावेळी पाटील यांनी दिला 'नौटंकी करण्यात मोदी हुशार आहेत असं ते पंजाबमध्ये मोदींचा रस्तारोको केला तेव्हा ते बोलेले आणि काल भंडारा (Bhandara) मध्ये ते पुन्हा बोले मोदींना शिव्या घालू शकतो. मारू शकतो असं म्हणाल्याचं पाटील यांनी सांगितलं.

हे देखील पहा -

भाजपचे नेते राज्यभर आंदोलन करत आहेत मात्र आमच्या तक्रारी देखील पोलिस ऐकून घेत नाहीत. गावोगावी पोलिस प्रशासन आम्हांला हैरान करत आहे, आम्ही नानांच्या विरोधात कोर्टात जाणार आहोत असून त्यांची तक्रार राज्यपालांकडे देखील तक्रार करणार असल्याचही पाटील यांनी सांगितलं.

तसंच नवाब मलिक (Nawab Malik) म्हणतात देवेंद्र फडणवीस यांना काशीचा घाट दाखवणार, मात्र काशीचा घाट म्हणजे मृत्यू म्हणजे मलिक काय नेमक दाखवणार ? शिवाय त्यांच्या वाक्याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांच्या जिवाला धोका असाच आहे. त्यामुळे आम्ही नवाब मलिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणार असल्याचही सांगितलं.

Nana Patole : 'नानांचा इतिहास वादग्रस्त नेते म्हणून'; आम्ही कोर्टात जाणार - चंद्रकांत पाटील
Nana Patole : 'त्या' मोदीला पोलिसांनी अटक केल्याची पटोलेंनी दिली माहिती

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सेनेसह राष्ट्रवादीवरती चांगलीच टीका केली आहे. मागील वर्षी गोव्यात शिवसेनेने तीन जागांवर निवडणूक आणि तिन्ही जागांवर डिपॅाझिट जप्त झाली आहे. तर उत्तर प्रदेशात ५७ जागा लढल्या ८८,५८५ मतदान मिळाली आणि ५६ डिपॅाझिट जप्त झाली. त्याच प्रमाणे राष्ट्रवादी मागील वेळी उत्तरप्रदेशात ४०३ पैकी ३० जागा लढली आणि ३० जागांवर डिपॅाझिट जप्त झाल तर गोव्यात राष्ट्रवादी १७ जागा लढली १६ ठिकाणी डिपॅाझिट जप्त झाली असल्याची आठवण त्यांनी यावेळी सध्याच्या त्यांच्या गोवा आणि उत्तरप्रदेशमधील निवडणुक लढविण्याच्या वक्तव्यांवरुन करुन दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com