Rahul Gandhi's Letter: "आम्ही न घाबरता तुमच्या पाठिशी आहोत" - केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात राहुल गांधींचा संजय राऊतांना पाठिंबा

Rahul Gandhi's Letter To Sanjay Raut: राऊतांना आता कॉंग्रेसचाही भक्कम पाठिंबा (Support) मिळाला आहे. कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी राऊतांना पत्र लिहित त्यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे.
We are with you without fear "- Rahul Gandhi's support to Sanjay Raut against Central Investigation Agency's
We are with you without fear "- Rahul Gandhi's support to Sanjay Raut against Central Investigation Agency's Saam Tv
Published On

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. केंद्रातील भाजप सरकार हे राष्ट्रीय तपास यंत्रणांंचा गैरवापर करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेते करतायत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीदेखील तपास यंत्रणांवर (Central Intelligence Agency's) गंभीर आरोप करत त्यांच्याविरोधात मोहिम उघडली आहे. याबाबत राऊतांना आता कॉंग्रेसचाही भक्कम पाठिंबा (Support) मिळाला आहे. कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी राऊतांना पत्र लिहित त्यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. (We are with you without fear "- Rahul Gandhi's support to Sanjay Raut against Central Investigation Agency's)

हे देखील पहा -

खासदार संजय राऊतांनी राहुल (Rahul Gandhi) गांधींकडून आलेलं पत्र सार्वजनिक करत त्यांना कॉंग्रेसचा पाठिंबा असल्याचं जाहिर केलं आहे. संजय राऊत यांनी राहुल गांधींचे आभार मानले आणि म्हणाले की, "धन्यवाद राहुल गांधीजी. लोकशाही मूल्ये आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्याच्या आमच्या प्रयत्नात, आम्हाला एकत्र लढावे लागेल. केंद्रीय एजन्सी एका पक्षाच्या गुलामाप्रमाणे वागत आहेत हे केवळ दुर्दैवी नाही तर धोकादायकही आहे. पण मला खात्री आहे, हे सुद्धा पार पडेल!" असं ट्विट राऊतांनी केलं आहे.

राहुल गांधींच्या पत्रात काय?

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात लिहिलं की, मला आशा आहे की या पत्राने तुम्हाला बरं वाटेल. 8 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यसभेच्या अध्यक्षांना उद्देशून तुमच्‍या पत्राची पोचपावती म्हणून हे पत्र आहे. तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना लक्ष्य करण्यासाठी विविध तपास यंत्रणांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांचा मी निर्विवादपणे निषेध करतो. तुमच्या पत्रात तपशीलवार छळवणूक आणि धमकावण्याच्या विविध घटना या मोदी सरकारच्या विरोधात असलेल्या नेत्यांना गप्प करण्याचा सरकारच्या प्रयत्न उघड करतात. लोकशाही प्रक्रिया मोडीत काढण्यासाठी तपास यंत्रणांच्या नियमित छळवणुकीमुळे संघटनेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. काँग्रेस पक्ष तुमच्या तुमच्या अभिव्यक्तीच्या अधिकारासाठी तुमच्या पाठीशी एकजुटीने उभा आहे आणि न घाबरता उभा असून तुम्हाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे, असं राहुल गांधींच्या पत्रात लिहिलं आहे.

We are with you without fear "- Rahul Gandhi's support to Sanjay Raut against Central Investigation Agency's
पाच अल्पवयीन मुलींवर बलात्कार करुन विकणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीस अटक...

राज्यात महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर कारवाई झाली आहे. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी (ED), एनसीबी (NCB), आयकर विभाग (IT), सीबीआय (CBI) यांसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर कारवाई किंवा चौकशी झाली आहे. यात मोठी नावं म्हणजे, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह उप-मुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय, खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि इतर अनेक बड्या नेत्यावंर तपास यंत्रणांनी कारवाई केली असल्याने महाविकास आघाडीने केंद्रातील भाजप सरकारवर सुडबुद्धीचं राजकारण करण्याचा आरोप केला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com