पाच अल्पवयीन मुलींवर बलात्कार करुन विकणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीस अटक...

डोंगरी येथील बालसुधारगृहातील १७ वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
काकाने अपहरण करुन 11 वर्ष केला बलात्कार; लग्न न केल्यास अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी
काकाने अपहरण करुन 11 वर्ष केला बलात्कार; लग्न न केल्यास अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी Saam TV
Published On

मुंबई: पाच अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी ५० वर्षीय व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रीकरण करून वेश्याव्यवसायात ढकलल्याचा आरोप त्या व्यक्तीवर करण्यात आला आहे. समुपदेशन करणाऱ्यांना १७ वर्षीय मुलीने ही माहिती दिली आहे. पाच अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी चेंबूर येथील आर.सी.एफ. पोलिसांनी ५० वर्षीय व्यक्तीविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. डोंगरी येथील बालसुधारगृहातील १७ वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

काकाने अपहरण करुन 11 वर्ष केला बलात्कार; लग्न न केल्यास अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी
Daily Horoscope: राशीभविष्य 9 मार्च 2022

डोंगरी येथली आशा सदन येथे समुपदेशन सुरू होते. त्यावेळी तिच्यासह तिच्या तीन लहान बहिणी (११ वर्ष, १३ वर्ष व १५ वर्ष वयाच्या) व एका मैत्रीणीवर आरोपी फिरोज शेख ऊर्फ बुढा अंकल याने बलात्कार केल्याची माहिती दिली. आरोपीने चित्रीकरण करून अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकलल्याेही या मुलीने तक्रारीत म्हटले आहे. चेंबूर येथील कुंठनखान्यातून पीडित १७ वर्षीय मुलीची २०१९ मध्ये सुटका करण्यात आली होती. तक्रारीनुसार आरोपीने पाच मुलींना गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावर सुरूवातीला लैंगिक अत्याचार केले होते. त्यानंतर आरोपीने त्याचे चित्रीकरण करून मित्रांना पाठवले व त्यांच्याकडून पैसे घेतले. त्यातील काही रक्कम या मुलींनाही आरोपीने दिली. चेंबूर परिसरात २०१८ ते २०२१ च्या दरम्यान घडली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com