Water Crisis : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, आज या भागात पाणीपुरवठा पूर्ण बंद

Pune Water Crisis : पुणेकरांवर आज पाणीबाणीचे संकट ओढावले आहे. अनेक भागात आज पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. कोणत्या भागात आज पाणी येणार नाही, त्याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात...
Water Crisis
Water CrisisSaam tv
Published On

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Pune Faces Water Emergency: पुणे शहरात आज अनेक ठिकाणी पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आजचा संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे. उद्या उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. ऐन उन्हाळ्यात पुण्यात पाणीबाणीचे संकट ओढावले आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग खालीलप्रमाणे

पर्वती जलकेंद्र

वडगाव जलकेंद्र

भामा आसखेड जलकेंद्र

गांधी भवन टाकी परिसर

पॅन कार्ड क्लब टाकी परिसर

एनडीटी पाणीपुरवठा केंद्र

चतुर्श्रुंगी

लष्कर

वारजे

पाषाण

Water Crisis
Pune Accident : कोथरूड पुलावर पहाटे दुचाकीचा भीषण अपघात, २ तरूणांचा जागीच मृत्यू

पर्वती जलकेंद्र अंतर्गत पाणीपुरवठा बंद असणारा भाग-

पर्वती MLR टाकी परिसर:- गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टर गेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहियानगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीम परिसर, घोरपडे पेठ, पर्वती दर्शन, मुकुंदनगर इ.

पर्वती HLR टाकी परिसर सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगरकाही भाग,

महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर भाग-१ व २, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोले मळा, सॅलेसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी, स.नं.४२ कोंढवा खुर्द, साईबाबानगर, इत्यादी.

Water Crisis
Pune Crime : अजित पवारांच्या राष्ट्रावीच्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा, पुण्यात खळबळ

वडगाव जलकेंद्र परीसर :-

दत्तनगर, टेल्को कॉलनी परिसर, संतोषनगर मुख्य रस्ता महावीकुंज, रेलीकॉन, दत्तनगर-आंबेगाव रस्ता, दत्तनगर चौक, संतोषनगर व अंजलीनगर परिसर, आगम मंदिर परिसर, गुरूद्वारा इत्यादी परिसर. कात्रजगाव, गुजरवाडी फाटा, निंबाळकर वस्ती, उत्कर्ष, राजस, इंद्रप्रस्थ, भूषण सोसायटी परिसर, सुखसागर नगर भाग-१ व भाग-२, कात्रज कोंढवा रस्ता, शिवशंभोनगर, गोकुळनगर, श्रीकृष्ण मंदिर परिसर, इस्कॉन मंदिर परिसर, टिळेकरनगर, येवलेवाडी, कोंढवा गाव, लक्ष्मीनगर परिसर, काकडे वस्ती, अशरफनगर, ग्रीनपार्क, साईनगर, गजानननगर, राजीव गांधी नगर, खडीमशीन परिसर, बालाजीनगर, श्रीहरी सोसायटी, गुरूदत्त सोसायटी, पुण्याई नगर, सिंहगड रस्ता परिसर, हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, धनकवडी, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकर नगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी काही भाग.

Water Crisis
Pune Crime : मावळ हादरलं, अनैतिक संबंधातून २२ वर्षीय तरुणाचा घेतला जीव

भामा आसखेड जलकेंद्र परिसर :- लोहगाव, विमाननगर, वडगावशेरी, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, धानोरी, इत्यादी

वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक (चौकोनी) टाकी परिसर :- पाषाण साठवण टाकी, भूगावरोडपरिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारतीन गर, बावधन परिसर, सारथीशिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहन नगर, सुस रोड, इत्यादी..

गांधी भवन टाकी परिसरः

कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुका नगर, हिल व्यू गार्डन सिटी, पाप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, बी. एस. यु.पी स्कीम, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलक नंदा, शिवप्रभा मंत्री पार्क-१, आरोह सोसायटी, श्रावण धारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृणमयी प्रीमारोज आर्चिड लेन ७ व ९. मुंबई पुणे बायपास रोड दोन्ही बाजू. शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियमस्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, राम नगर, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड. पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लबरोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईट रोड, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्त नगर, इ.

धावडे परिसर

एस. एन. डी.टी पपिंग अंतर्गत पाणीपुरवठा बंद असणारा भाग -एस. एन. डी. टी. (एच. एल. आर.) : गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बैंक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी, गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडीयल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदुवाडी, भोसले नगर, अशोकनगर, खैरेवाडी, शिवाजी हौ. सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, वडारवाडी, पोलीस लाईन, संगमवाडीइत्यादी.

एस. एन. डी. डी. (एम. एल. आर.) :

लॉ कॉलेज रोड, पौड रोड शीला विहार कॉलनी, अद्वैत सोसा. भीमनगर, वेदांतनगरी, कुलश्री कॉलनी परिसर झोनिंग पध्दतीने, सहवास, क्षिप्रा, मनोहन सोसा. विठ्ठल मंदिर परिसर झोननिंग करून, गोसावी वस्ती परिसर, करिष्मा सोसायटी समोरील परिसर, बीग बाझार परिसर, बंधन सोसायटी परिसर, डी. पी. रस्ता (पार्ट), मयुर कॉलनी परिसर, मयुर डी. पी. रस्त्याची डावी बाजु, कर्वेरोड झाला सोसायटी ते शिवाजी पुतळ्या पर्यंतचा भाग, एरंडवणा परिसर, दशभूजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत म्हात्रे पुलापर्यंत एच. ए. कॉलनी टिळेकर प्लॉट, भरतनगर अर्चनानगर, भरतकुंज, स्वप्नमंदीर, सुनिता, युको बँक कॉलनी, टैंकर पॉईट डि. पी. रस्ता मंगेशकर हॉस्पिटल, हिमाली सोसायटी, वकिलनगर इत्यादी, करिष्मा सोसा., ते वारजेवार्ड ऑफिस गिरीजा शंकर, नवसह्याद्री ताथवडे उद्यान परिसर निलकमल युनायटेड वेस्टर्न अनुरेखा स्थैर्य, मधूचय, शैलेश, अलंकार, मनिषा, स्वस्तिश्री, रघुकुल महिम्न, सुखा जयशक्ती, इत्यादी.

चतुः श्रृंगी टाकी परीसर - औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ, परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंदपार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानाश्रीसोसायटी, नॅशनल, सिंधसोसायटी, औंधगाव परिसर.

पाषाण पंपिंग व सुस गोल टाकी परिसर- गणराज चौक, पॅनकार्ड रोड, वीरभद्र नगरचा काही भाग समर्थ कॉलनी काही भाग इत्यादी.

नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपींग भागः मुळा रोड, खडकी कॅन्टॉनमेंट संपूर्ण परिसर, MES, "HE Factory, हरीगंगा सोसायटी इत्यादी.

लष्कर जलकेंद्र भाग :- संपुर्ण रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, सय्यदनगर, हेवनपार्क, गोसावी वस्ती शंकर मठ, वैदूवाडी, रामनगर, आनंदनगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोधळेनगर, ससाणेनगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोलापूर रोड डावी बाजू, केशवनगर मांजरी बु., शेवाळेवाडी, बी.टी. कवडे रोड, भीमनगर, बालाजीनगर, विकासनगर, कोरेगावपार्क, ओरीयंट गार्डन, साडेसतरानळी, महंमदवाडी रस्ता उजवीकडील संपूर्ण भाग, संपूर्ण हांडेवाडी रोड, फुरसुंगी उरुळी देवाची भेकराईनगर (टँकरद्वारे पाणीपुरवठा बंद), हाय सर्व्हिस, बेकर हिल, रेसकोर्स, ठाकरसी टाकी, कॅम्प, ससून.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com