मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्स (Cruise drugs) प्रकरणात कारवाई करुन आर्यन खानला Aryan Khan अटक केलेले NCB अधिकारी समीर वानखेडेंवरती Sameer Wankhede राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक Navab Malik यांनी अनेक आरोप केले आहेत. तसेच ते वानखेडेंबाबत सतत नवनवीन खुलासे करुन वानखेडे हिंदू की मुस्लीम असा प्रश्न देखील उपस्थित करत आहेत. वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचे फोटो सर्टीफिकट देखील मलिकांनी सोशल मिडीयावरती टाकली होती आणि तेंव्हापासून समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर Kranti Redkar या सर्व आरोपांना उत्तर देत मलिकांनी केलेले आरोप खोडून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.
हे देखील पहा -
अशातच रेडकर यांनी आज त्यांचे सासरे ज्ञानदेव वानखेडे यांच्यासोबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले Ramdas Athvale यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले यांनी आपण वानखेडे कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे असून समीर वानखेडेंच्या केलालाही धक्का लागून देणार नसल्याच त्यांनी म्हटंल आहे तसेच जर नवाब मलिर समीर वानखेडे मुस्लीम आहेत असं म्हणत आहेत तर मग मुस्लीम माणूस मुस्लीम माणसावर अशी बयानबाजी आणि आरोप का करत आहे असा सवाल रामदास आठवलेंनी उपस्थित केला आहे.
तसेच आपण आंबेडकरी समाजाचे अनुयायी असल्याचे आपणाला वानखेडे कुटुंबीयांनी सांगितल आहे. आणि त्यांची सर्व कागदपत्रे बघून रिपब्लिकन पार्टी ऑप इंडिया त्यांच्या सोबत असल्याचही रामदास आठवलेंनी सांगितलं. तसेच मलिक माझे चांगले मित्र असून त्यांनी हे सर्व आरोप थांबवावे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.