काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान; दोन दशकानंतर गांधी कुटुंबा व्यतिरिक्त अध्यक्ष

देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेस (Congress) पक्षाच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान पार पडत आहे.
Congress President Election
Congress President ElectionSaam TV
Published On

शिवानी काळे -

नवी दिल्ली: देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेस (Congress) पक्षाच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान पार पडत आहे. काँग्रेस नेते मल्लीकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) आणि काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) निवडणूकीच्या मैदानात आहे.

गेली २४ वर्ष काँग्रेसचं अध्यक्षपद गांधी कुटुंबाकडे आहे. त्यामुळं काँग्रेसला दोन दशकानंतर गांधी कुटुंबाव्यतिरिक्त अध्यक्ष मिळणार आहे. या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी देशभरातील 9 हजार 800 डेलीगेट्स देशातील विविध 40 मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत.

दिल्लीतील काँग्रेस मुख्यालय असणाऱ्या 24 अकबर रोड इथे देखील बूथ लावण्यात आला असून या ठिकाणी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यासह 50 डेलिगेट्स मतदान करणार आहेत. तर भारत जोडो यात्रेत कर्नाटकात असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे बेल्लारी इथं मतदान करतील.

गेल्या 40 वर्षात आत्तापर्यंत 2 वेळेस काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक झाली आहे.

1997 ची निवडणूक -

1997 च्या या निवडणूकीत सीताराम केसरी यांनी शरद पवार आणि राजेश पायलट यांचा पराभव केला होता. या निवडणूकीत सीताराम केसरी यांना 6 हजार 224 तर शरद पवार यांना 882 तर राजेश पायलट यांना 354 मतं मिळाली होती.

2000 ची निवडणूक -

मागील निवडणूक 2000 साली झाली होती. तेव्हा सोनिया गांधी यांच्या विरोधात जितेंद्र प्रसाद यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणूकीत सोनिया गांधी यांनी जितेंद्र पसाद यांना हरवलं होतं.

Congress President Election
Andheri East Bypoll: अंधेरीची पोटनिवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता; सागर बंगल्यावरील बैठकत चर्चा

सोनिया गांधी यांना 7 हजार 448 मत मिळाली होती. जितेंद्र प्रसाद यांना 94 मतं मिळाली होती. तेव्हापासून म्हणजे गेल्या 24 वर्षापासून काँग्रेसचं अध्यक्ष गांधी घराण्याकडेच आहे. गेल्या 24 वर्षापासून राहुल गांधी आणि सोनिया गांधीच अध्यक्ष आहेत.

सोनिया गांधी 1998 ते 2017

राहुल गांधी 2017 ते 2019

सोनिया गांधी 2019 ते आत्तापर्यंत अध्यक्ष आहेत. त्यामुळं काँग्रेसला गांधी घराण्याच्या व्यतिरिक्त कोणीही अध्यक्ष गेल्या 24 वर्षात मिळालेला नाही. यावेळेस गांधी घराण्याच्या व्यतिरिक्त व्यक्ती काँग्रेसचा अध्यक्ष होणार आहे.

2019 च्या झालेल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अध्यक्ष पदाची जबाबदारी पुन्हा एकदा सोनिया गांधी यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यानंतर पक्षातील अनेक नेत्यांनी काँग्रेस पक्षाचा हात सोडत काँग्रेसला राम राम ठोकला आहे. सातत्याने राहुल गांधी यांनी पक्षाचं अध्यक्ष पद स्वीकारावं म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आग्रह धरत आले आहेत. त्यामुळं आत्ता होणाऱ्या निवडणूकीत कोण अध्यक्ष होणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com