Viral Video : दारू पिऊन झिंगला, ४थ्या मजल्याच्या खिडकीत उभा राहून स्टंट केला अन्... पाहा VIDEO

Dombivli Drunk Boy Viral Video : डोंबिवलीतील नेमाडे परिसरात दारूच्या झिंगेत तरुण ४ थ्या मजल्यावरील खिडकीबाहेर लटकला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Viral Video : दारू पिऊन झिंगला, ४थ्या मजल्याच्या खिडकीत उभा राहून स्टंट केला अन्...  पाहा VIDEO
Dombivli Drunk Boy Viral VideoSaam tv
Published On
Summary
  • डोंबिवलीतील नेमाडे परिसरात मद्यपीचा ४ थ्या मजल्यावरून खिडकीबाहेर स्टंट

  • घटनेत जीवितहानी नाही

  • नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केली घटना

  • व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

संघर्ष गांगुर्डे, कल्याण- डोंबिवली

डोंबिवलीत दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांच्या घटना सतत समोर येत आहेत. अशातच काल रात्री एक मद्यपी खिडकीबाहेर लटकत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सुदैवाने या थरकाप उडवणाऱ्या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नसून नागरिकांनी तातडीने अशा मद्यपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना ही डोंबिवलीतील नेमाडे परिसरात घडली आहे. संबंधित इसम काल रात्रीच्या सुमारास भरपूर प्रमाणात दारू पिऊन होता. नेमाडे परिसरातील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील खिडकीत दारूच्या झिंगेत तोल जाऊन तो बाहेर लटकला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मद्यपानाच्या अतिसेवनामुळे किती गंभीर प्रसंग ओढवू शकतात, याचे हे जिवंत उदाहरण असल्याची चर्चा नागरिकांत होत आहे.

Viral Video : दारू पिऊन झिंगला, ४थ्या मजल्याच्या खिडकीत उभा राहून स्टंट केला अन्...  पाहा VIDEO
Farmer Stamp Duty Waiver : शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! २ लाखांपर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ; नेमकी काय आहे योजना? वाचा

व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, एक तरुण इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील खिडकीवर लटकला आहे. या तरुणाने दारू पिल्यामुळे त्याचा तोल जात असल्याचे म्हटले आहे. हा तरुण सर्वात आधी खिडकीत बसला. नंतर तो खिडकीत उभा राहून काहीतरी बडबडू लागला.

तरुणाचा सतत तोल जात होता. तरीही तो स्टंट करतच राहिला. दरम्यान रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांनी हा प्रकार पहिला. क्षणात या मद्यपीच्या गोंधळाने आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी जमले. आणि मोबाईल काढून घडत असलेली घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी मद्यपान आणि सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com