सामना विधान परिषद निवडणूकांचा; काय आहे पक्षीय बलाबल, जाणून घ्या

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
सामना विधान परिषद निवडणूकांचा; काय आहे पक्षीय बलाबल, जाणून घ्या
सामना विधान परिषद निवडणूकांचा; काय आहे पक्षीय बलाबल, जाणून घ्याSaam TV
Published On

रश्मी पुराणिक

मुंबई : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने कोल्हापूर, नागपूर, धुळे-नंदुरबार, अकोला-बुलडाणा-वाशिम आणि मुंबई अशा पाचही जागांवर आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भाजपने काँग्रेसमधून आलेल्या तीन उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे. धुळे-नंदुरबार मतदारसंघाचे उमेदवार अमरिश पटेल (Amrish Patel), मुंबईतून संधी मिळालेले उमेदवार राजहंस सिंग (Rajhans Dhananjay Singh) आणि कोल्हापूर मतदारसंघातून तिकीट मिळालेले अमल महाडिक (Amal Mahadik) हे तिघेही मूळ काँग्रेसचे नेते आहेत.

दरम्यान राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. मागील काही निवडणुकांमध्ये आघाडीच्या उमेदवारांनी सरशी मारलेली पाहायला मिळाली आहे. कोल्हापुरमधून मंत्री सतेज पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्याचबरोबर कोल्हापुरातून पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, आणि त्यांना कोल्हापुरमधून विजयासाठीचे प्रबळ दावेदार समजले जात आहे.

अशी आहे पक्षीय बलाबल

मुंबई

विद्यमान

* रामदास कदम- शिवसेना

* भाई जगताप- काँग्रेस

एकूण 227

कोट्याला मत (77)

शिवसेना (97), भाजप (83), काँग्रेस (29), राष्ट्रवादी (8), सपा (06), MIM (02), मनसे (01), अरुण गवळी (01).

सामना विधान परिषद निवडणूकांचा; काय आहे पक्षीय बलाबल, जाणून घ्या
मृत घोषित केलेला व्यक्ती अचानक घ्यायला लागला श्वास; डॉक्टर चक्रावले

कोल्हापूर

विद्यमान

सतेज पाटील

एकूण मतदार (415)

कोटा (209)

काँग्रेस (50), राष्ट्रवादी (54), शिवसेना (54), जनता दल (16), स्वाभिमानी (02), स्थानिक आघडी (87), भाजप (85), ताराराणी (36), जनसुराज्य (27), अपक्ष (11).

नागपूर

विद्यमान गिरीश व्यास

एकूण मतदार (562)

कोटा 282

भाजप (314), कोंग्रेस (144), राष्ट्रवादी (15), शिवसेना (25), बसपा (11), विदर्भ माझा (17), इतर (30), रिक्त (02).

धुळे- नंदुरबार

विद्यमान अमरीश पटेल

एकूण मतदार (399)

कोटा (200)

भाजप (199), कोंग्रेस (136), राष्ट्रवादी (20), शिवसेना (20), इतर (24).

अकोला-बुलडाणा-वाशिम

विद्यमान

गोपिकिशन बाजोरिया (शिवसेना)

एकूण मतदार (821)

भाजप (244), काँग्रेस (190), राष्ट्रवादी (76), शिवसेना (130), वंचित बहुजन आघाडी (85), इतर (171).

विधान परिषद निवडणुकीसंदर्भात १६ नोव्हेंबर २०२१ रोजी अधिसूचना काढण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २३ नोव्हेंबर तर २४ नोव्हेंबरला छाननी होणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख असणार आहे. मतदान हे १० डिसेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या दरम्यान होणार असून मतमोजणी १४ डिसेंबर रोजी होणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com