Kalyan : कल्याणमध्ये भररस्त्यात राडा! भांडी घेण्यास नकार दिल्याने परप्रांतीय दुकानदाराकडून मराठी महिलांना शिवीगाळ

Kalyan Marathi Hindi Controversy : कल्याण पूर्वेतील कोळसवाडी परिसरात भांडी खरेदीच्या मुद्द्यावरून दुकानदार आणि ग्राहकांमध्ये वाद निर्माण झाला. महिलांनी दुकानात ठिय्या देत जाब विचारला.
Kalyan : कल्याणमध्ये भररस्त्यात राडा! भांडी घेण्यास नकार दिल्याने परप्रांतीय दुकानदाराकडून मराठी महिलांना शिवीगाळ
Kalyan Marathi Hindi ControversySaam Tv
Published On
Summary
  • भांडी खरेदीच्या मुद्द्यावरून कल्याण पूर्वेत वाद

  • दुकानदार आणि ग्राहकांमध्ये जोरदार बाचाबाची

  • महिलांनी दुकानात एक ते दीड तास ठिय्या दिला

  • स्थानिक नागरिकांच्या मध्यस्थीने तणाव निवळला

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

राज्यात मराठी विरुद्ध परप्रांतीय हा वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशातच कल्याण पूर्वेतील कोळसवाडी परिसरात भांडी खरेदीच्या मुद्द्यावरून दुकानदार आणि ग्राहकांमध्ये तणाव निर्माण झाला. भांडी महाग सांगितल्याने मराठी ग्राहक आणि परप्रांतीय विक्रेत्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली. ग्राहक दुकानातून बाहेर पडताच हा वाद वाढला आणि मोठा गोंधळ झाला. या घटनेत महिलांनी आक्रमक भूमिका घेत दुकानदारांना जाब विचारला.

कल्याण पूर्व येथील अजय स्टील या दुकानात शिवशाही प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्ते महिलांच्या एका कार्यक्रमासाठी लकी ड्रॉमध्ये देण्यासाठी भांडी खरेदीस गेले होते. मात्र दुकानदाराने भांड्यांचे दर जास्त सांगितल्याने पदाधिकाऱ्यांनी इतर दुकानातून भांडी घेऊ असे सांगत दुकानाबाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

याच गोष्टीचा राग आल्याने दुकान मालक, त्यांची पत्नी आणि मुलगी यांनी पदाधिकाऱ्यांना अपशब्द वापरत शिवीगाळ व मारहाणीचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर संबंधित संघटनेच्या कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांना घटनास्थळी बोलावण्यात आले.

Kalyan : कल्याणमध्ये भररस्त्यात राडा! भांडी घेण्यास नकार दिल्याने परप्रांतीय दुकानदाराकडून मराठी महिलांना शिवीगाळ
Shocking : हॉट आहेत का? ... मैत्रिणीचे कपडे बदलताना व्हिडिओ काढून प्रियकराला पाठवले; इंजिनीअरिंग कॉलेजच्या होस्टेलमध्ये धक्कादायक प्रकार

परप्रांतीय दुकानदारांनी महिलांना पुढे करून मराठी माणसांना शिवीगाळ व मारहाण करण्याचा प्रयत्न करणे अयोग्य आहे, असा आरोप करत महिलांनी दुकानात जोरदार गोंधळ घातला. तब्बल एक ते दीड तास दुकानात ठिय्या देत महिलांनी दुकान मालकाला जाब विचारला. अखेर परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करत परिस्थिती शांत केली आणि वाद मिटवण्यात आला. या घटनेमुळे काही काळ कोळसवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com