MNS: ठाण्यातल्या सभेसाठी राज ठाकरेंकडून वसंत मोरेंना निरोप नाही; मोरेंची नाराजी कायम?

Vasant More Latest News: या सभेला वसंत मोरे यांना मनसे नेते अभिजित पानसे आणि अमेय खोपकर यांनी निमंत्रण दिले, पण राज ठाकरे यांच्याकडून कुठलाही निरोप नाही.
Vasant More resentment persists?
Vasant More resentment persists? Saam Tv
Published On

पुणे: पुण्यातील मनसे नगरसेवक साईनाथ बाबर, बाबू वागस्कर आणि इतर पदाधिकारी आज मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेणार आहेत. ९ एप्रिललला ठाण्यात राज ठाकरेंची सभा होणार आहे, या सभेला वसंत मोरे (Vasant More) यांना मनसे (MNS) नेते अभिजित पानसे (Abhijit Panse) आणि अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी निमंत्रण दिले, पण राज ठाकरे यांच्याकडून कुठलाही निरोप नसल्याने वसंत मोरे यांची नाराजी कायम असल्याची चर्चा आहे. (Vasant More resentment persists Raj Thackeray has not sent a message to More for the meeting in Thane)

हे देखील पहा -

राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या सभेतील भाषणांत त्यांनी मशीदीवरील भोंग्यावर आक्षेप घेतला होता. भोंगे उतरवले नाही तर मशीदीसमोर हनुमान चालीसा लावा असं आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं. मात्र, राज ठाकरेंच्या या भुमिकेला मनसेचे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी समर्थन दिलं नाही. तसेच आपल्याला आपल्या प्रभागात शांतता हवी असून लोकप्रतिनीधी म्हणून ही भूमिका अडचणीत आणणारी आहे, त्यामुळे आपण आपल्या प्रभागातील मशीदीसमोर भोंगे लावणार नसल्याचं मोरे यांनी स्पष्ट केलं होतं. यानंतर ९ एप्रिलला ठाण्यात होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेत राज ठाकरेंनी वसंत मोरे यांना स्वतः निमंत्रण दिले नाही, त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा मनसेत आहे.

वसंत मोरेंनी केलं होतं सूचक ट्विट -

पुण्यातील मनसेचे शिलेदार वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकणाऱ्या पुण्यातील (Pune) पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. याबाबत त्यांनी सूचक ट्विट (Tweet) केलं होतं. यात वसंत मोरे म्हणाले की, "एखाद्या किल्ल्याचे बुरुज ढासाळायला लागले ना की किल्ला पडायलाही वेळ लागत नाही. जेव्हा एखादा नेता पक्षाचा राजीनामा देतो ना तेव्हा नक्की त्याचा काहीतरी स्वार्थ असतो पण जेव्हा एखादा शाखाअध्यक्ष, एखादा कार्यकर्ता राजीनामा देतो ना तेव्हा त्याला जरूर समजावून संगायला पाहिजे. तेव्हा आज शाखा अध्यक्ष माजिद शेख व वाहतूक उपशहराध्यक्ष शहाबाज पंजाबी यांच्या घरी गटनेते साईनाथ बाबर जनाधिकार शहराध्यक्ष नरेंद्र तांबोळी, उपशहराध्यक्ष आशिष देवधर, विभागाध्यक्ष गणेश भोकरे, महिला विभागाध्यक्ष सौ.नीता पालवे, उपशहराध्यक्ष अझहर सय्यद, एसटी कामगार शहर अध्यक्ष ललित तींडे, महिला उपविभागाध्यक्ष नाझ इनामदार, शाखाध्यक्ष सलीम सय्यद, मोहसीन शिकालकार, विजय रजपूत, संग्राम तळेकर यांचेसह भेटून आलो. पोरांच्या चेहऱ्यावर काय हसू आलं राव! जय मनसे!" वसंत मोरे यांच्या या ट्विटवरुन पुण्यातील मनसे समर्थकांमध्ये चर्चांना उधाण आलंय. यातून ते राज ठाकरेंना विनंतीवजा सूचना करत आहेत का? असा सवाल उपस्थित होतोय.

मशिदीवरील भोंग्याबाबत राज ठाकरेंची भूमिका-

मशिदीवरचे भोंगे खाली उतरवावे लागतील, मी धर्मांध नसून धर्माभिमानी असल्याचे म्हणत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मशिदीवरील भोंग्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केला. जर सरकारने मशिदीवरील भोंगे उतरवण्याचे काम केले नाही तर आम्ही त्या मशिदींसमोर मोठमोठे स्पीकर लावून हनुमान चालीसा लावू असे राज ठाकरे म्हणाले.

Vasant More resentment persists?
गिरणी कामगारांच्या सदनिका दुरुस्तीसाठी मंत्री जितेंद्र आव्हाडांनी बोलावली महत्वाची बैठक

हनुमान चालीसा लावण्यास वसंत मोरेंचा स्पष्ट नकार -

राज ठाकरेंच्या भोंग्याबाबतच्या भूमिकेवर वसंत मोरे म्हणाले की, राज ठाकरेंची भूमिका चुकीची नाही. मला भूमिकेबाबतीत नाही तर कार्यकर्त्यांनी थोडं शांततेनं घेतलं पाहिजे असं वाटतं. आमचे काही कार्यकर्ते उत्साही असतात त्यामुळे त्यांनी लावली हनुमान चालीसा लावली. "पण मी माझ्या प्रभागात असे काही करणारं नाही. सध्या रमजान सुरु आहे, मला माझ्या प्रभागात शांतता हवी आहे. म्हणून मी हनुमान चालीसा वगैरे काही लावणार नाही" असे देखील वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com