गिरणी कामगारांच्या सदनिका दुरुस्तीसाठी मंत्री जितेंद्र आव्हाडांनी बोलावली महत्वाची बैठक

Mill Workers Latest News: पनवेलमधील कोन इथे गिरणी कामगारांच्या घराची सोडत २०१६ साली काढण्यात आली होती. पण ही घरं अद्याप गिरणी कामगारांना हस्तांतरित करण्यात आलेली नाहीत.
An important meeting was held by Minister Jitendra Awhad for repairing flats of mill workers ab95
An important meeting was held by Minister Jitendra Awhad for repairing flats of mill workers ab95Saam Tv
Published On

मुंबई: गिरणी कामगारांच्या गृह दुरुस्ती खर्चावर गोडगा काढण्यासाठी आज (७ एप्रिल) दुपारी १ वाजता महत्वाची बैठक पार पडणार आहे. म्हाडा, एमएमआरडीए, गिरणी कामगार नेत्यांची गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बैठक बोलावली आहे. पनवेलमधील (Panvel) कोन इथे गिरणी कामगारांच्या (Mill Workers) घराची सोडत २०१६ साली काढण्यात आली होती. पण ही घरं अद्याप गिरणी कामगारांना हस्तांतरित करण्यात आलेली नाहीत. या गिरणी कामगारांच्या सदनिका दुरुस्तीसाठी मंत्री जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) ही महत्वाची बैठक बोलावली आहे. (An important meeting was held by Minister Jitendra Awhad for repairing flats of mill workers)

हे देखील पहा -

An important meeting was held by Minister Jitendra Awhad for repairing flats of mill workers ab95
INS विक्रांतच्या नावाखाली पैसे लाटल्याचा आरोप; किरीट सोमय्यांसह मुलगा नीलवर गुन्हा दाखल

कोविड काळात या घरांचा वापर रायगड जिल्हा अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत असताना कोविड रुग्णांसाठी वापर करण्यात आला होता. सध्या पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी एमएमआरडीएला आणि एमएमआरडीएने म्हाडाला ही घरं सुपूर्द केली आहेत. पण या घरांची दुरुस्ती करण्याची गरज आहे. म्हाडाला या सदनिकांच्या वितरणातून एकही रुपया मिळणार नसल्याने दुरुस्ती खर्च उचलण्यास नकार दिलाय, तर एमएमआरडीएला १५० कोटी मिळणार असून त्यांनीही खर्चास नकार दिलाय. हा खर्च ५० कोटी रुपये अपेक्षित असल्याने खर्च कोण करणार यावर तोडगा काढण्यासाठी सरकार मध्यस्ती करणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com