वसई विरार महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर

एकूण ४२ प्रभाग तयार करण्यात आले असून त्यात १२६ नगरसेवक असणार आहेत.
वसई विरार महापालिका
वसई विरार महापालिका SaamTvNews
Published On

वसई विरार : वसई विरार महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे लवकर महापालिकेच्या निवडणूका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार प्रभाग रचनेचा आराखडा मंगळवार १ फेब्रुवारी रोजी प्रसिध्द करण्यात येणार असून त्यावर १४ फेब्रुवारी पर्यंत हरकती आणि सूचना सादर करता येणार आहे.

हे देखील पहा :

करोना मुळे वसई विरार महापालिकेची २०२० मध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक लांबणीवर पडली होती. त्यानंतर नव्या धोरणानुसार एकसदस्यीय प्रभागाऐवजी त्रिसदस्यीय प्रभाग रचनेची निर्मिती करण्यात आली होती. महापालिकेने बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीनुसार प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा सादर केला होता. त्याला निवडणूक आयोगाने मंजूरी दिली आहे. हा प्रभाग रचनेचा आराखडा मंगळवार १ फेब्रुवारी रोजी सर्वसामान्य जनतेसाठी प्रसिध्द केला जाणार असून त्यावर १४ फेब्रुवारी पर्यंत हरकती आणि सूचना नोेंदविता येणार आहे. २ मार्च रोजी अंतिम मंजूरीसाठी आराखडा निवडणूक आयोगाला सादर केला जाणार आहे.

वसई विरार महापालिका
Hupari Video : चिकन विक्रेत्याकडून पत्नीची क्रूर हत्या; सत्तुराने केले शरीराचे तुकडे!

४२ प्रभाग, १२६ नगरसेवक

राज्य निवडणूक आयोगाने २०११ च्या जनगणेनुसार प्रभाग रचना करण्याचे निर्देश महापालिकेला दिले होते. त्यानुसार महापालिकेने त्रिसदस्यीय प्रभाग रचेनचा आराखडा निवडणूक आयोगाला सादर केला होता. त्यानुसार एकूण ४२ प्रभाग तयार करण्यात आले असून त्यात १२६ नगरसेवक असणार आहेत. या निवडणूका इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाशिवाय होणार असल्याने १२६ पैकी ६ जागा अनुसूचित जाती आणि ६ जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव असणार आहेत. महिलांसाठी ६३ जागा राखीव असून त्यातील अनुसूचित जाती आणि जमातीच्या महिलांसाठी प्रत्येकी ३ जागा राखीव आहेत.

वसई विरार महापालिका
"मला भाई का म्हणाला नाही" म्हणत तरुणास मारहाण करणाऱ्या आरोपींचे मुंडन करून धिंड!

असा आहे कार्यक्रम :

१ फेब्रुवारी - निवडणूक प्रभागांच्या सीमा दर्शविणारी प्रारूप अधिसूचना शासना राजपत्रात प्रसिध्दी

१ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी - हरकची आणि सूचना मागवणे

१६ फेब्रुवारी - आलेल्या हरकती आणि सूचनांच्या विविरणपत्र राज्य निवडणूक आयोगास सादर करणे

२६ फेब्रुवारी - हरकतींवर सुनावाणी

२ मार्च - सुनावणींवरील हरकतींच्या शिफारशी नमूद करून राज्य निवडणूक आयोगास पाठवणे

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com