Kandivali News : ऐकावं ते नवलच! जन्मापूर्वीचा मिळाला वाहन परवाना, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा अजब कारभार

Kandivali News Update : वसई येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा अजब कारभार उघडकीस आला आहे. उमेदवाराच्या जन्म तारखेच्या एक वर्ष आधीच त्याला वाहन परवाना दिल्याची तारीख नमूद करण्यात आली आहे.
Kandivali News
Kandivali NewsSaam Digital
Published On

Kandivali News

वसई येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा अजब कारभार उघडकीस आला आहे. उमेदवाराच्या जन्म तारखेच्या एक वर्ष आधीच त्याला वाहन परवाना दिल्याची तारीख नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे जन्मापूर्वीच तरुणाला वाहन परवाना मिळाल्याचा हास्यास्पद प्रकार घडला आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा चुकांचा भुर्दंड सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागातील वाहन आणि सारथी प्रणालीत ऑनलाईन स्वरूपात अर्ज दाखल करून कामे केली जात आहेत. वाहन प्रणालीत वाहनांच्या संदर्भातील विविध कामे; तर सारथी प्रणालीत परवान्याची कामे केली जात आहेत. परवान्याबाबत ऑनलाईन प्रणालीत डाटा अद्ययावत करत असताना अनेक जणाच्या परवान्यात बदल झालेले दिसून येत आहेत. फोटो बदली होणे, लिंग बदल झालेले आहेत. याची दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांचा आर्थिक फटका बसत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kandivali News
Congress Meeting : काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठकीला ४५ पैकी किती आमदार गैरहजर?, नावे आली समोर

वसई परिक्षेत्रातील वाहन परवानाधारक किशोर पवार यांच्या परवान्यावर २१ जानेवारी १९८७ अशी तारीख लिहिण्यात आली आहे. हास्यास्पद बाब म्हणजे त्याखाली पवार याची जन्मतारीख ९ ऑगस्ट १९८८ अशी नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे किशोर पवारचा जन्म होण्यापूर्वीच त्याला वाहन परवाना दिल्याचा प्रकार घडला आहे. परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या चुकीचा फटका तरुणाला बसला आहे. ही दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा त्याला आर्थिक भुर्दंड बसणार आहे.

Kandivali News
Pune News: पुण्यात १७ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार; देहविक्री करण्यास भाग पाडलं; पती-पत्नीविरोधात गुन्हा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com