Vasai News : सावधान! वसई किल्ल्यात बिबट्याचा वावर; वन विभागाने परिसरात बसवले कॅमेरे

Vasai Leopard News : वसई किल्ला परिसरात शुक्रवारी एका दुचाकीने बिबट्याला जोरदार धडक दिली. रात्री ८ च्या दरम्यान ही घटना घडल्याचा अंदाज वर्तविला जात असून या अपघातात बिबट्या जखमी झाला आहे.
Vasai News
Vasai NewsSaam Digital

Vasai News

वसई किल्ला परिसरात शुक्रवारी एका दुचाकीने बिबट्याला जोरदार धडक दिली. रात्री ८ च्या दरम्यान ही घटना घडल्याचा अंदाज वर्तविला जात असून या अपघातात बिबट्या जखमी झाला आहे. त्यामुळे भागात बिबट्याचा वावर असल्याचं स्पष्ट झालं असून परिसरात दहशतीचं वातावरण आह. वनविभाग आणि वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशन संस्थेमार्फत बिबट्याचा शोध घेण्यात येत आहे.

वसई किल्ला प्रवेशद्वार ते जेट्टीला जोडणाऱ्या रस्त्यावर फिरत असलेल्या बिबट्याला एका दुचाकी स्वाराने धडक दिली. अपघातानंतर दुचाकीस्वाराने तेथून पळ काढला. त्याच्या गाडीची तुटलेली नंबरप्लेट घटनास्थळावरून वनविभागाच्या हाती लागली आहे. याचबरोबर या संपूर्ण घटनेनंतर बिबट्याला पकडण्यासाठी वसई किल्ल्यामध्ये वन विभागाने अनेक कॅमेरे लावण्यात आले. त्यामध्ये बिबट्या कैद झालेला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.

Vasai News
Mira Bhayandar News : उत्तनमधील कचरा डेपोला भीषण आग; चारचाकी वाहन जळून खाक

वसई किल्ल्याचा परिसर ओलांडून हा बिबट्या रस्त्यावर आला आणि त्याचवेळी या दुचाकीस्वाराची त्याला धडक बसली. रात्री दोन वाजताच्या सुमारास हे कॅमेरे बसवण्यात आले. त्यानंतर परिसरात पाहणी केली असता किल्ल्याच्या परिसरामध्ये बिबट्याच्या पायांचे ठसे देखील सापडले आहेत. सध्या वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरू आहे तसेच पोलिसांकडून अधिकृत नोटीस देखील जाहीर करण्यात येणार आलं असून सतर्क राहण्याचं आवाहनही करण्यात येत आहे.

Vasai News
Sant Tukaram Beej 2024 : वर्सोव्यातील चौपाटीवर उभारली आयोध्या मंदिराची लक्षवेधी प्रतिकृती, हरिनाम सप्ताहात भक्त तल्लीन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com