Maharashtra Election: कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी, दरेकरांचा एकाकी प्रचार

Vaishali Darekar : कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं दिसत आहे. ठाकरे गटाने निवडणुकीच्या मैदानात उतरवलेल्या उमेदवाराला एकाट्याने प्रचार करावा लागत असल्याचं सांगितलं जात आहे.
Maharashtra Election: कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी, दरेकरांचा एकाकी प्रचार
Vaishali Darekar Campaigning In Kalyan Lok Sabha Constituency
Published On

अभिजीत देशमुख

Vaishali Darekar Campaigning In Kalyan Lok Sabha Constituency: कल्याण : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिलीय. काँग्रेसने मात्र वैशाली दरेकर यांच्याबाबत नाराजी व्यक्त केलीय. वैशाली दरेकर या एकाकी प्रचार करतायत.

काँग्रेस कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत. काँग्रेस नगरसेवकाच्या वॉर्डात प्रचार करतात मात्र काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी नगरसेवकांना याबाबत कोणत्याही प्रकारची कल्पना दिली जात नाही असा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केलाय. याबाबत बैठक घेण्यात आली असून लवकरच याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात येणार आहे त्यानंतर पुढची भूमिका ठरवण्यात येईल असे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले . त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी बिघाडी झाल्याचे संकेत मिळत आहेत.

लोकसभेच्या रणधुमाळीत सर्व पक्षीय उमेदवारांनी जोर पकडला आहे.त्यातच कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागुण आहे . या ठिकाणी महायुतीतर्फे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून निवडणूकीचा प्रचार सुरु आहे. तर महाविकास आघाडी कडून ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी वैशाली दरेकर यांच्या प्रचाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे .श्रीकांत शिंदे महायुतीतील शिवसेना ,राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यासह अनेकांच्या भेटी गाठी घेत आहे. इतकेच नाही तर शिंदे यांनी काल डोंबिवलीतील काँग्रेस पक्षाच्या तीन नगरसेवकांच्या भेटी घेतल्या. त्यामुळे अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या. अशा भेटी घेऊन शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या तंबूत घबराहट उडवून देण्याचा प्रयत्न केलाय.

दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवार दरेकर यांनी काल हनुमान जयंती निमित्त कल्याण पूर्वेत भेट दिली. काँग्रेस जिल्हाध्यक्ष पोटे यांचा वॉर्डात त्यांना कसलीही पूर्व कल्पना न देता प्रचार करत होत्या . वैशाली दरेकर या एकाकी प्रचार करत आहेत त्यांच्या प्रचारादरम्यान काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवकांना कोणत्याही प्रकारची कल्पना देत नसल्याने काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव असल्याने यातून उघड झाले आहे.

Maharashtra Election: कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी, दरेकरांचा एकाकी प्रचार
Maharashtra Election: हिशेब चुकता केल्याशिवाय राहणार नाही; शिवसेना पळवल्याचा आरोप करत उद्धव ठाकरेंचं भाजपला आव्हान

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com