Corona Vaccination: आजपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचं लसीकरण

सध्या लसीकरणासाठी ९ लसीकरण केंद्र सज्ज
Corona Vaccination: आजपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचं लसीकरण
Corona Vaccination: आजपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचं लसीकरणSaam Tv

मुंबई - मुंबईत ९ लसीकरण केंद्रावर आजपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु होणार आहे. आज वांद्रे-कुर्ला संकूल कोविड लसीकरण केंद्रातून सकाळी ११ वाजता या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे दूरदृश्य प्रणालीद्वारे या मोहिमेचा शुभारंभ करणार आहेत.

मुंबई महापालिकेकडे सध्या आठवडाभर पुरतील एवढे ३ लाख डोस उपलब्ध आहेत ,लवकरच येत्या आठवड्यासाठी ९ लाख डोस मिळवण्याचा पालिकेचे प्रयत्न आहे.

हे देखील पहा -

लस घेण्यासाठी पात्रता आणि नियम

- 2007 साली किंवात्यापूर्वी जन्मलेल्या मुलांना लस घेता येणार आहे , ही मुलं लसीकरणासाठी पात्र आहेत.

- मुलांना लसीकरणासाठी शाळेचे ओळखपत्र किंवा आधारकार्ड लस घेण्यासाठी घेऊन येणं अनिवार्य असेल .

- पालकांनी मुलांसोबत यावे अशी महापालिकेची विनंती आहे .

- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत त्यांचे शिक्षक असतील.

- मुलांना कोवॅक्सिन लशीचे डोस देण्यात येतील .

- थेट केंद्रावर जाऊन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध .

- पालकांच्या किंवा स्वतःच्या फोन क्रमांकावरून विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी .

Corona Vaccination: आजपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचं लसीकरण
Beed: मजुर घेऊन चाललेला टेम्पो पलटी; एक ठार, 7 जखमी

कुठे लस मिळेल ?

- भायखळामधील रिचर्डसन ऍण्ड क्रूडास भायखळा कोविड लसीकरण केंद्र

- शीव मधील सोमय्या मैदानावरील जम्बो कोविड लसीकरण केंद्र

- वरळीतील एनएससीआय डोम जम्बो कोविड लसीकरण केंद्र

- वांद्रे कुर्ला संकुलातील बीकेसी जम्बो कोविड लसीकरण केंद्र

- गोरेगाव (पूर्व ) मधील नेस्को जम्बो कोविड लसीकरण केंद्र;

- मालाड (पश्चिम) मधील मालाड जम्बो कोविड लसीकरण केंद्र,

- दहिसर जम्बो कोविड लसीकरण केंद्र

- कांजूरमार्ग (पूर्व) मधील क्रॉम्प्टन ऍण्ड ग्रीव्हज जम्बो कोविड लसीकरण केंद्र.

- मुलुंड (पश्चिम) मधील रिचर्डसन ऍण्ड क्रूडास मुलुंड जम्बो कोविड लसीकरण केंद्र.

- भायखळामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालय येथे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी देखील लसीकरण केंद्र आहे.

सध्या लसीकरणासाठी ९ लसीकरण केंद्र सज्ज असेल,तरी आगामी काळात महापालिकेकडुन प्रभाग लसीकरण केंद्र, शाळा या याठिकाणी लसीकरण सुरू केलं जाणार आहे .

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com