मावळ: मावळात (Maval) मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस (Untimely rains) पडत आहे. अधून-मधून अवकाळी पावसाच्या अचानक सरी आल्यामुळे सर्व सामान्य लोकांबरोबरच शेतकऱ्यांची देखील धांदल उडाली. मावळात भाताच्या पिकांचे ज्याप्रमाणे नुकसान झाले त्याप्रमाणेच वीटभट्टीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने वीटभट्टी मध्ये लागणारी माती वाहून गेली. त्याचप्रमाणे भट्टीत टाकलेल्या विटांचे देखील नुकसान झाले आहे. (Untimely rains also hit brick kilns; Demand for compensation through Panchnama)
हे देखील पहा -
वीटभट्टीमध्ये काम करण्यासाठी इतर ठिकाणाहून कामगार आणले जातात. परंतु अवकाळी पावसाने नुकसान झाले तरी या कामगारांना पगार आणि रोजची हजेरी द्यावीच लागत असल्याचे खंत वीटभट्टी मालकांनी व्यक्त केली आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे पंचनामे करून नुकसानभरपाई दिली जाते. त्याचप्रमाणे आमच्या वीटभट्टीचे पंचनामे करून सरकारने आम्हाला देखील नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी देखील वीटभट्टी चालकांनी केली आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.