पुणे : कोरोना आढावा बैठकीनंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. येत्या सोमवारपासून (११ ऑक्टोबर) पासून पुणे शहर आणि ग्रामीण भागातील सर्वच वरिष्ठ महाविद्यालये आणि विद्यापीठे सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
अजित पवारांचे महत्वपूर्ण निर्णय :
सोमवार पासून खासगी आस्थापनात 100 टक्के उपस्थितीला परवानगी
हॉटेल्स रेस्टॉरंट रात्री 11 पर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी
नाट्यगृह 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी
सोमवार पासून राज्य आणि केंद्र सरकारचे ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात येणार आहेत.
पुणे शहर आणि ग्रामीणमधील सर्व विद्यापीठे सोमवार पासून सुरु होणार
जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे खुली करण्यास परवानगी
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.